उष्णतेने सध्या सर्वांनाच हैराण केले आहे. तापमान अनेक भागात 40 अंशापार गेले आहे. उष्णतेची ही लाट आणखी तिन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शनिवार पर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे विदर्भासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा फटका बसण्याचा आंदाजही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वेळेला दोन ऋतू राज्यात पाहायला आणि अनुभवायला भेटत आहे.
उष्णतेची लाट कुठे?
उष्णतेची लाट पुढील तिन दिवस म्हणजे शनिवारपर्यंत कायम राहाणार आहेत. आहे. यामध्ये मुंबई, ठाणे पुणे या शहरांचा समावेश आहे. तर कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हिट वेव्ह असेल. मुंबई आणि ठाण्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. आतापर्यंत कर्जत मध्ये सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली आहे. कर्जतचा पारा 44 अंशाच्या पार गेला होता. दरम्यान महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशातही उष्णतेची लाट आहे. या सर्व राज्यात सरासरी तापमान हे चाळीस पार आहे.
हेही वाचा - लेकीसाठी आई मैदानात, अजित पवारांनी डोक्यावर हात मारला, नक्की काय घडलं?
अवकाळीचा ही इशारा
एकीकडे उष्णतेने सर्वच जण हैराण होत असताना राज्यातल्या काही भागात अवकाळीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसापासून राज्यात अवकाळीने धुमाकुळ घातला आहे. येणाऱ्या काही दिवसातही या अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भागात ताशी ४० किलोमिटर वेगाने वारे वाहाणार असल्याचेही सांगितले जात आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर पुढील सात दिवसांत त्यामध्ये आणखी वाढ होईल, असा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, धाराशिव, लातूर, हिंगोली, परभणी, बुलडाणा, अमरावती, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक या भागात पाऊस हजेरी लावेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - 'या' नायिकने केलंय 12 वी मध्ये टॉप, IAS ऑफिसर होता-होता झाली हिरोईन!