जाहिरात
Story ProgressBack

लेकीसाठी आई मैदानात, अजित पवारांनी डोक्यावर हात मारला, नक्की काय घडलं?

Read Time: 2 min
लेकीसाठी आई मैदानात, अजित पवारांनी डोक्यावर हात मारला, नक्की काय घडलं?
बारमती:

बारातमी लोकसभेत निकराची लढाई लढली जात आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना इथं रंगला आहे. सुप्रिया सुळेंसाठी संपुर्ण पवार कुटुंब प्रचारासाठी गुंतलं आहे. सभांचा, बैठकांचा, भेटीगाठींचा सपाटा लावला गेला आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार एकाकी खिंड लढवत आहे. अशा वेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आई प्रतिभा पवारही मैदानात उतरल्या होत्या. हा धागा पकडत अजित पवारांनी टिकेची संधी सोडली नाही. सर्व भावंडं प्रचारात आहेत हे माहित होतं पण प्रतिभा काकाही प्रचारात उतरल्यात हे ऐकून आपण डोक्यावर हात मारला असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.  

काकी प्रतिभा पवारांबद्दल काय म्हणाले दादा 
शरद पवारांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळेंच्या आई प्रतिभा पवार सध्या बारामतीत प्रचार करत आहे. याबाबत अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रतिभा काकी 90 नंतर कधीही प्रचारात दिसल्या नाहीत. मी ही कधी त्यांना पाहीलं नाही. तुम्हीही त्यांना कधी पाहीलं नाही. पण आता त्याही प्रचारात दिसत आहे. हे ऐकून आपण डोक्यावर हात मारल्याचे अजित पवारांनी सांगितले. पुर्वी बारामतीत अर्ज भरल्यानंतर शेवटची एकच सभा होत होती. पण आता जागोजागी फिरावं लागत आहे. प्रचार सभा घ्याव्या लागत आहे असा टोला त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता मारला.    

हेही वाचा - अमरावतीत विरोधकांची एकी, वाढवणार नवनीत राणांची डोकेदुखी?

'लोकसभेला इकडे विधानसभेला तिकडे' 
बारामतीत लोकसभेला इकडे आणि विधानसभेला तिकडे अशी चर्चा सुरू होती. हे चित्र बदलायला पाहिजे म्हणून सुनेत्रा पवारांना लोकसभेच्या मैदनात उतरवल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीसाठी मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमची असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. विधानसभेला ढिगभर मतदान कराल पण लोकसभेलाही ते झाले पाहीजे. भावनिक होऊ नका. काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभे रहा. बारामतीत भरपूर कामं केली आहे. जर ही कामे दुसऱ्या मतदार संघात केली असती तर बिनविरोध निवडणूक झाली असती असेही ते म्हणाले. 

हेही वाचा - 'मार्क माय वर्ड...', इम्तियाज जलील यांच्या दाव्याने विरोधकांचं टेन्शन वाढणार

बारातमतीत सुळे विरूद्ध पवार 
बारामतीती लोकसभेचे वातावरण चांगलेच तापले आहे.  सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी शरद पवारांनी आपल्या हातात घेतली आहे. तर सुनेत्रा पवारांकडून अजित पवार पुढे सरसावले आहे. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई जरी असली तरी खरी लढाई ही शरद पवार विरूद्ध अजित पवार अशीच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवारांनी आपले एकेकाळचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांच्या बरोबर जुळवून घेतले आहे. तर दुसरीकडे शरद पवारही जुन्या सहकार्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.   

हेही वाचा - उदयनराजें समोरच आजोबांनी कॉलर उडवली, राजेंनी काय केलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination