जैसे ज्याचे कर्म... चोरट्याचा 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, दोनच दिवसांपूर्वी केली होती एकची हत्या

दोनच दिवसांपूर्वी अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी पार्क साईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण केली होती.  या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

तुम्ही जे पेरता तेच उगवतं असं म्हणतात. हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीसोबतही तसंच काहीसं घडलं. चोरी करताना १४ व्या माळ्यावरून पडून या आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

अक्षय बाईत असे या आरोपीचे नाव असून तो विक्रोळी परिसरात राहत होता. रविवारी पहाटे अक्षय हा विक्रोळी टागोरनगर परिसरातील मधुबन सोसायटीत चोरीच्या उद्देशाने शिरला होता. तिथेच त्याला मृत्यूने गाठलं. 

Advertisement

टागोरनगर परिसरात चोरी करताना 14 व्या मजल्यावरून अक्षयचा पाय घसरला आणि इमारतीवरून खाली पडली. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली. अक्षयवर या पूर्वीच हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

दोनच दिवसांपूर्वी अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी पार्क साईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण केली होती.  या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हत्येनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह हा कसारा येथे टाकला होता. या गुन्ह्यात इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. तर अक्षय हा फरार आरोपी होता.  दरम्यान आज त्याचा चोरी करताना इमारतीवरुन पडून मृत्यू झाला. या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू झाला असून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world