जाहिरात

Kalyan News: शिवसेना ठाकरे गटाचे 3 नगरसेवक अद्याप नॉट रिचेबल, कल्याणमध्ये मोठा उलटफेर होणार?

15 फेब्रुवारीपर्यंत गट नोंदणीची तारीख आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहू नाही, तर कारवाई अटळ आहे.

Kalyan News: शिवसेना ठाकरे गटाचे 3 नगरसेवक अद्याप नॉट रिचेबल, कल्याणमध्ये मोठा उलटफेर होणार?
  • कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे ११ नगरसेवक विजयी झाले
  • नॉट रिचेबल असलेल्या तिघांपैकी दोन नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत
  • महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे फक्त आठ नगरसेवक उपस्थित होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कल्याण:

अमजद खान 

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षे प्रमाणे महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शिवसेना ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले. पण त्याचं समाधान शिवसेना ठाकरे गटाला फार काळ उपभोगता आलं नाही. त्यातील तीन नगरसेवक हे गायब झाले. ते नॉटरिचेबल होते. महापौर उपमहापौर निवडणुकीत ही ते अनुपस्थित होते.  शिवसेना ठाकरे गटाचे 11 पैकी 8 नगरसेवक उपस्थित होते. त्यामुले या तीन नगरसेवकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ठाकरेंचे तीन नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल आहेत. तीन पैकी दोन नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पक्षाकडून वारंवार इशारा देऊन सुद्धा हे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात नाहीत. या तीन पैकी एक नगरसेवक परतण्याची शक्यता आहे. यात किती तथ्य आहे याची ही चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भातील चित्र लवकर समोर येणार आहे असं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे.  

नक्की वाचा - Shocking news: विद्यार्थ्यांनीच प्राध्यापकाला धु-धू धुतलं!,Video होतोय तुफान Viral, कारण ऐकून हादरून जाल

कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. निवडणूक प्रक्रियेसाठी महासभेचे आयोजन केले होते. या महासभेत शिवसेना ठाकरे गटाचे नॉट रिचेबल असलेल्या चार नगरसेवकांपैकी केवळ एकच नगरसेविका महापौर पदाच्या निवडणूकीस हजर होती. आता ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या 8 झाली आहे. पक्षाचे गटनेते उमेश बोरगांवकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नॉट रिचेबल असलेल्या तिघांना पक्षाकडून  नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याकडून लवकरच खुलासा आपेक्षित आहे असं ही ते म्हणाले.  

नक्की वाचा - Navneet Rana: लग्नाचा वाढदिवस अन् राणा दाम्पत्य पोहोचलं 'या' खास ठिकाणी, Video होतोय Viral, कमेंटचा ही पाऊस

15 फेब्रुवारीपर्यंत गट नोंदणीची तारीख आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहू नाही, तर कारवाई अटळ आहे. नॉट रिचेबल असलेले राहुल कोट, स्वप्नाली केणे, मधूर म्हात्रे हे घरी  परतल्याची माहिती आहे. हे महापौर पदाच्या निवडणूकीस आले नाही. ते पक्षाच्या संपर्कातही नाही. यातील दोन नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक नगरसेवक पक्षात परतण्याचे संकेत आहे. पण हे सर्व ते नगरसेवक समोर येवून काय भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय ठाकरे गट त्यांच्यावर काय कारवाई करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com