Mankhurd Incident News : मानखुर्दमध्ये एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. एका चाळीतील घराचा भाग कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही भयंकर घटना आज रात्री 8.30 वाजताच्या सुमारास मंकुर्ड येथील हनुमान मंदिरामागील जनता नगर परिसरात घडली. तीन मजली बांधकाम सुरू असताना चाळीच्या इमारतीचा काही भाग कोसळला.
VIDEO | Mumbai: A multi-storey 'chawl' collapses in Mankhurd amid heavy rains. Rescue operations on.
— Press Trust of India (@PTI_News) July 5, 2026
(Source: Third Party)#Mumbai #Mankhurd pic.twitter.com/OswY1757XH
दरम्यान,ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, संबंधित विभागाचे कर्मचारी आणि रुग्णवाहिकाही दाखल झाली असून शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world