Tomato Price : टोमॅटोला अडीच रुपये किलोचा भाव, वाहतुकीचा खर्चही सुटेना; शेतकरी हवालदिल

मध्यंतरी पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दराने शंभरी गाठली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला प्रतिवारीनुसार (Tomato Prize Crash) चार ते पाच रुपये तर काही ठिकाणी अडीच रुपये आकारले जात आहे. किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये दर मिळाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. मध्यंतरी पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दराने शंभरी गाठली होती. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर या सर्व भागात टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यात दुसऱ्या राज्यातूनही टोमॅटोची आवक होत असल्याने येथे टोमॅटोचे दर घसरले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

टोमॅटोला अडीच रुपयांचा भाव, शेतकरी पुन्हा संकटात
टोमॅटोचा हब असलेल्या पुण्यातील नारायणगाव बाजारात टोमॅटो एकेकाळी दोनशे रुपये प्रतिकिलोने विकला गेलाय, मात्र आता टोमॅटोचे दर थेट अडीच रुपयांपर्यंत घसरलेत. हा घाऊक बाजारातील दर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा लाल चिखल होण्याची वेळ आलीये. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दर ढासळलेत, परिणामी कालच्या बाजारात अडीच ते दहा रुपये प्रति किलो असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दर हळूहळू पडू लागलेत. मुद्दल ही हातात येत नसल्यानं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय.

नक्की वाचा - Crime Story: इन्स्टाग्रामवर मैत्री,अश्लील फोटो अन् अल्पवयीन विद्यार्थिनी, सलग 5 वर्ष भयंकर घडलं

जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अक्षरश: चिखल झाला आहे. उत्तर भारतात सर्वाधिक निर्यात होणाऱ्या टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन जुन्नर आंबेगाव शिरुर खेड तालुक्यात होत आहे. गेल्या वर्षी टोमॅटोने शेतकऱ्यांना चांगली कमाई करुन दिली. मात्र यंदा टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रतिकिलो बाजार मिळत असल्याने शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणलेय टोमँटोचे दर अचानक कोसळल्याने उत्पादन खर्च सोडाच वाहतूक खर्चही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चिखल होत आहे. 

Advertisement

टोमॅटोला पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चही निघणे झाले कठीण..
टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने हिंगोलीतील शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला आहे. काही महिन्यांपूर्वी शंभरी पार केलेला टोमॅटो आता मात्र आवक वाढल्याने पाच रुपयांवर आला आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतीतून आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टीकोनातून मोठया आशेने लागवड केली होती. मात्र टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याने वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे, त्यामुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला आहे.

Topics mentioned in this article