BMC Top 10 Richest Corporators: श्रीमंत महापालिकेतील 'कुबेर'! टॉप 10 नगरसेवकांची कोट्यवधींची संपत्ती

BMC Top 10 Richest Corporators : मुंबईच्या श्रीमंत महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. मकरंद नार्वेकर यांनी संपत्तीच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

BMC Top 10 Richest Corporators:  मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 चे निकाल जाहीर झाले असून, देशातील या सर्वात श्रीमंत महापालिकेत निवडून आलेले नगरसेवकही 'कुबेर' असल्याचे समोर आले आहे. भाजप 89 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून, श्रीमंत नगरसेवकांच्या यादीतही भाजपच्या उमेदवारांचे वर्चस्व आहे.

मुंबईच्या श्रीमंत महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. मकरंद नार्वेकर यांनी संपत्तीच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे.

(नक्की वाचा-  मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

सर्वाधिक श्रीमंत नगरसेवकांची यादी 

  1. मकरंद नार्वेकर (भाजप) - 124 कोटी रुपये
  2. चंदन शर् (भाजप) - 84 कोटी 77 लाख 99 हजार 635 रुपये
  3. हर्षिता नार्वेकर (भाजप) - 63 कोटी रुपये
  4. मिनल तुर्डे  ( शिवसेना, शिंदे)  - 55 कोटी 17 लाख 50 हजार 842 रुपये
  5. तुलिप मिरांडा (काँग्रेस) - 50 कोटी 69 लाख 70 हजार 150 रुपये
  6. श्रद्धा जाधव (ठाकरे गट)- 46 कोटी 34 लाख 72 हजार 743 रुपये
  7. अनिता वैती (भाजप) -  28 कोटी 88 लाख 10 हजार रुपये
  8. हेतल गाला (भाजप) - 27 कोटी 93 लाख 40 हजार 281 रुपये
  9. यशोधर फणसे (ठाकरे गट) - 25 कोटी 84 लाख 92 हजार 240 रुपये
  10. भास्कर शेट्टी  (शिवसेना शिंदे) - 25 कोटी 37 लाख 26 हजार रुपये

(नक्की वाचा-  VIDEO: बसमधील एका 'रील'ने घेतला जीव! विनयभंगाचा आरोप, सोशल मीडिया ट्रायलला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या)

पक्षनिहाय श्रीमंत नगरसेवक

मुंबई महापालिकेतील टॉप 10 श्रीमंत उमेदवारांची यादी पाहिल्यास सर्वाधित 5 भाजपचे नगरसेवक आहेत. तर शिवसेना (UBT) 2 शिंदेंच्या शिवेसेनेचे 2 तर काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. 
 

Topics mentioned in this article
BMC