जाहिरात

VIDEO: बसमधील एका 'रील'ने घेतला जीव! विनयभंगाचा आरोप, सोशल मीडिया ट्रायलला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या

सिमजिथा मुस्तफा नावाच्या एका महिला इन्फ्लुएंसरने गर्दीच्या बसमध्ये प्रवास करताना एक 26 सेकंदांचा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड केला.

VIDEO: बसमधील एका 'रील'ने घेतला जीव! विनयभंगाचा आरोप, सोशल मीडिया ट्रायलला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या

सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात आणि कोणत्याही सत्यतेशिवाय एखाद्याला दोषी ठरवण्याच्या प्रवृत्तीने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. केरळमधील कोझिकोड येथील एका कापड गिरणी कामगाराने सोशल मीडियावरील द्वेष आणि मानहानीला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. केवळ २६ सेकंदांच्या एका व्हिडिओने एका व्यक्तीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले, ज्यामुळे डिजिटल बेजबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

16 जानेवारी रोजी सिमजिथा मुस्तफा नावाच्या एका महिला इन्फ्लुएंसरने गर्दीच्या बसमध्ये प्रवास करताना एक 26 सेकंदांचा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये तिने आरोप केला की, शेजारी उभे असलेले दीपक यू हे बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते.

VIDEO

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

सोशल मीडिया ट्रायल आणि नफरत

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. नेटकऱ्यांनी कोणत्याही चौकशीशिवाय दीपक यांना 'नराधम' ठरवून त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. दीपक यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र सोशल मीडियावरील या 'डिजिटल शिक्षे'मुळे त्यांचे मानसिक संतुलन कोलमडले.

18 जानेवारीला संपवले जीवन

लोकांच्या सततच्या टोमण्यांना आणि ऑनलाईन छळाला कंटाळून दीपक यांनी 18 जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या निधनानंतर आता हे प्रकरण सोशल मीडिया ट्रायलच्या धोक्यांवर एका नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

(नक्की वाचा-  BMC Election : मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली; सर्वाधिक भाजपचे, गुजराती किती?)

कुटुंबियांची पोलीस कारवाई

दीपक यांच्या कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी असा दावा केला आहे की, दीपक निर्दोष होते. गर्दीच्या बसमध्ये लागलेल्या धक्क्यांमुळे झालेला स्पर्श हा 'विनयभंग' म्हणून दाखवला गेला. पोलिसांनी सध्या या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, त्या व्हायरल व्हिडिओची आणि दीपक यांच्यावर झालेल्या सायबर बुलिंगची चौकशी सुरू केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com