राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईच्या वांद्र्यातील खेरवाडी परिसरार हत्या करण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर 3 अज्ञात हल्लेखोरांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास गोळीबार केला. या गोळीबारानंतर लीलावती रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
(नक्की वाचा- बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणारे 2 आरोपी अटकेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती)
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाबाबत 10 ठळक मुद्दे
- बाबा सिद्दिकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील चार गोळ्या त्यांना लागल्या.
- बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. दोन्ही आरोपी हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे आहेत.
- बाबा सिद्दिकी यांचा केवळ फोटो आरोपींकडे होता. ते नेमके कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय? हे देखील आरोपींना माहिती नव्हते.
- हत्येसाठी 9.9 एमएमची पिस्तूल वापरण्यात आली. पोलिसांनी पिस्तूल देखील जप्त केली आहे.
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळीच आरोपी बाबा सिद्दिकींवर हल्ला करणार होते. काही कारणास्तव हे शक्य झालं नाही.
- प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे अधिकारी दया नायक हे करत आहे.
- झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या (SRA) वादातून ही हत्या झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- बाबा सिद्दिकी आणि सलमान खानची चांगले मैत्रिपूर्ण संबंध होते. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला धमकी मिळाही होती. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगचं काही कनेक्शन आहे का? या अँगलनेही तपास सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
- लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित अनेक शूटर उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा यांसारख्या राज्यांतील आहेत. हत्येमागे बिश्नोई गँग आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र अद्याप कोणत्याही गँगने या हत्येची जबाबदारी घेतलेली नाही.
- बाबा सिद्दिकी यांना धमकी देणारे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहे.