Mumbai Crime News : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱ्यांनी एका 51 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर पासपोर्टची काही पाने जाणूनबुजून फाडल्याचा आरोप आहे. याचे कारण त्याचा बँकॉक प्रवास असल्याचे सांगितले जाते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बँकॉकच्या प्रवासाबद्दल कुटुंबापासून लपवण्यासाठी पासपोर्टची पाने फाडणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी आरोपी विजय भालेराव यांना तपासणी दरम्यान थांबवले. त्यावेळी त्यांच्या पासपोर्टची काही पाने फाटलेली आढळली.
(नक्की वाचा - ओढणीनं आवळला गळा, मृतदेह घेऊन बाईकवर फिरले, प्रियकरासोबत पकडलं म्हणून YouTuber नं घेतला नवऱ्याचा जीव)
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भालेराव गेल्या वर्षी चार वेळा बँकॉकला गेले होते. या महिन्याच्या सुरुवातीला तो मुंबई विमानतळावरून इंडोनेशियाला गेले होते. चौकशीदरम्यान, बँकॉकच्या प्रवासाबद्दल कुटुंबापासून लपवण्यासाठी त्यांनी पासपोर्टची पाने फाडल्याचे उघड झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
(नक्की वाचा - Vishal Gawli : 'विशाल गवळीची जेल प्रशासनानं हत्या केली', आईचा आरोप, कोर्टात घेणार धाव)
भालेराव यांनी पासपोर्टशी छेडछाड का केली याचे कारण देण्यास आधी नकार दिला. मात्र इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांना कसून चौकशी केली त्यावेळी त्यांना बँकॉकच्या सहली कुटुंबापासून लपवण्यासाठी पाने फाडल्याची कबुली दिली. भालेराव यांना सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि भारतीय दंड संहिता (BNS) आणि पासपोर्ट कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.