जाहिरात

Vishal Gawli : 'विशाल गवळीची जेल प्रशासनानं हत्या केली', आईचा आरोप, कोर्टात घेणार धाव

Kalyan Crime Vishal Gawli : विशाल गवळीला जेलमध्ये त्रास दिला जात होता, असा आरोप विशालची आई इंदिरा गवळीनं केला आहे.

Vishal  Gawli : 'विशाल गवळीची जेल प्रशासनानं हत्या केली', आईचा आरोप, कोर्टात घेणार धाव
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी 

Kalyan Crime Vishal Gawli Suicide : कल्याणमध्ये चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळीनं काही दिवसांपूर्वी तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली. विशालने जेलमधील शौचालयात टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले होते. विशालनं आत्महत्या केली नाही त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले किंवा जेल प्रशासनानं त्याची हत्या केली असा आरोप त्याच्या आईनं केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विशालनं गळफास घेतला नाही. त्याला पोलिसांनी फाशी दिली. त्याला जेलमध्ये त्रास दिला जात होता, असा आरोप विशालची आई इंदिरा गवळीनं केला आहे. तर, विशालच्याा आई-वडिलांना त्यानं आत्महत्या केली नाही असा संशय आहे. ज्या दिवशी आत्महत्या केली त्यावेळी विशालचे वडील आणि काका आतमध्ये गेले होते. ती परिस्थिती पाहून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं किंवा त्याला जेल प्रशासनानं मारलं असा संशय आहे. या प्रकरणात आम्ही याचिका दाखल करणार आहोत, असं विशालचे वकील संजय धनके यांनी सांगितलं. 


काय होते प्रकरण?


23 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. अल्पवयीन मुलगी परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली.

ओढणीनं आवळला गळा, मृतदेह घेऊन बाईकवर फिरले, प्रियकरासोबत पकडलं म्हणून  YouTuber नं घेतला नवऱ्याचा जीव

( नक्की वाचा :  ओढणीनं आवळला गळा, मृतदेह घेऊन बाईकवर फिरले, प्रियकरासोबत पकडलं म्हणून YouTuber नं घेतला नवऱ्याचा जीव )

24 डिसेंबर रोजी मुलीच्या मृतदेह कल्याणनजीक बापगाव परिसरात सापडला. मुलीच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटलला पाठवण्यात आला.शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचेही नाव समोर आले.

विशाल गवळी याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले. त्यावेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता.  आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी 7 वाजता घरी आली. 7 वाजता दोघे पती-पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याबद्दल योजना आखली.

त्यापूर्वी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री 8.30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. 9 वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले.  घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला. पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली. मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल याने हे कृत्य केल्याचा संशय आला.

पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी विशालला पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: