Mumbai News: पश्चिम उपनगरात 5 दिवस वाहतुकीत बदल, या मार्गांवरून प्रवास टाळा

Mumbai Traffic Update: वाहतूक बदलाचे हे निर्बंध 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाले असून, ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत, दररोज सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू असतील.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Traffic Change: मुंबईतील पश्चिम उपनगरात NESCO प्रदर्शन केंद्रात 'इंडिया मेरीटाईम वीक' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, तसेच अनेक व्हीव्हीआयपी  आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याने, वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी पश्चिम उपनगर विभागात काही तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.

वाहतूक बदलाचे हे निर्बंध 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाले असून, ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत, दररोज सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू असतील.

नो एन्ट्री असलेले मार्ग

  • मृणालताई गोरे जंक्शनपासून NESCO गॅपपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. 
  • राम मंदिर रोडकडून NESCO गॅप पर्यंत जाणारा उजवा वळण मार्ग बंद राहील.
  • हब मॉलकडून NESCO किंवा जयकोच जंक्शनकडे जाणारी सेवा लेन सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

(नक्की वाचा-  Hubli Pune Vande Bharat: पुणेकरांसाठी गुडन्यूज! हुबळी–पुणे एक्स्प्रेस आणखी एका स्टेशनवर थांबणार)

एकमार्गी वाहतूक

NESCO गॅप पासून मृणालताई गोरे जंक्शनकडे जाणारा रस्ता एकमार्गी करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग

  • राम मंदिर रोडकडून येणाऱ्या वाहनांनी मृणालताई गोरे उड्डाणपूल, महानंदा डेअरी, पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) सेवा रस्ता, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड मार्गे प्रवास करावा.
  • JVLR जंक्शनकडून येणारी वाहने पवई किंवा मुंबईकडे WEH सेवा मार्गाने जाऊ शकतात.

(नक्की वाचा-  Inspirational Story: ठाणे RTO  ते 'इस्रो' शास्त्रज्ञ! 29 वर्षांच्या सुजाता मडके यांची मोठी भरारी)

पार्किंग निर्बंध

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आपत्कालीन वाहने वगळता वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे,  नेस्को सेवा रस्ता, खान्जाजी रस्ता, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सेवा रस्ता, ट्रामा केअर हॉस्पिटल सेवा रस्ता, महानंदा डेअरी ते WEH सेवा रस्ता, वैनराई पोलीस स्टेशन सेवा रस्ता, निरंजन कंपनी सेवा रस्ता, अशोक नगर सेवा रस्ता पार्किंग प्रतिबंधित असेल. 

Topics mentioned in this article