Nagpur News: तुरुंगात आईची तडफड; बापाने सख्ख्या लेकींचे लचके तोडले; तृतीयपंथीयांकडून मुलींची सुटका

Nagpur News: तृतीयपंथीयांनी तातडीने आरोपीच्या घरात प्रवेश केला. त्यांनी 9 आणि 12 वर्षांच्या पीडित मुलींना वाचवले. त्यांनी आरोपी बापाला मारहाण देखील केली आणि त्याला वाठोडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर

Nagpur News : नागपूरमधून एका कुटुंबाची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीच्या गैरहजेरीत एका निर्दयी बापानेच आपल्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र, तृतीयपंथीयांच्या एका ग्रुपने या मुलींची सुटका केली. हा भयानक प्रकार यावर्षी ऑक्टोबर महिन्यात उघडकीस आला. आरोपी बापाने तीन महिन्यांहून अधिक काळ त्यांच्यावर कथितरित्या बलात्कार केला

कशी उघडकीस आली घटना?

पीडित कुटुंबातील 14 वर्षीय लहान मुलगा घरातून पळून गेला आणि त्याने एका शेजाऱ्याकडे मदत मागितली. शेजारी व्यक्तीने तात्काळ जवळपास राहणाऱ्या तृतीयपंथीयांच्या एका ग्रुपला या घटनेबद्दल माहिती दिली. तृतीयपंथीयांनी तातडीने आरोपीच्या घरात प्रवेश केला. त्यांनी 9 आणि 12 वर्षांच्या पीडित मुलींना वाचवले. त्यांनी आरोपी बापाला मारहाण देखील केली आणि त्याला वाठोडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी वडिलांना तात्काळ अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींना पुनर्वसन आणि समुपदेशनासाठी सरकारी निवारागृहात पाठवण्यात आले आहे. तृतीयपंथीयांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे या गरीब आणि पीडित मुलींना न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)

आईची हृदयद्रावक कहाणी

मुलींची आई सध्या तुरुंगात आहे आणि तिची कहाणी देखील खूप वेदनादायक आहे. चार मुलांची आई असलेल्या या 35 वर्षीय महिलेने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घरगुती हिंसेतून सुटका मिळवण्यासाठी आपल्या चार मुलांसोबत दिल्लीतून नागपूरला पलायन केले होते.

Advertisement

यावर्षी जून महिन्यात नागपूर जिल्ह्यातील कुही येथील एका बांधकाम साइटवर ती आणि तिचा 17 वर्षांचा मोठा मुलगा काम करत होते. कामाच्या आठव्याच दिवशी, मजूर ठेकेदाराने कथितरित्या या महिलेला एका निर्जन ठिकाणी ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचा मुलगा तिच्या मदतीसाठी धावला. या झटापटीत ठेकेदार जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

(नक्की वाचा-  VIDEO: "नवले पुलाजवळ स्पीड गन पावत्या फाडण्यासाठी बसवलेल्या नाहीत", महिला वाहतूक पोलिसाचे वाहनचालकांना खडेबोल)

घाबरलेले मायलेक पळून गेले, पण पकडले गेले. महिलेला नागपूर मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले आहे, तर तिच्या मुलाला अल्पवयीन गुन्हेगारांसाठी असलेल्या बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. आता अत्याचारी वडिलांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article