जाहिरात

VIDEO: " स्पीड गन पावत्या फाडण्यासाठी बसवलेल्या नाहीत", महिला पोलिसाचे वाहनचालकांना खडेबोल

Pune News: एका महिला वाहतूक पोलिसाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या महिला पोलीस भगिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO: " स्पीड गन पावत्या फाडण्यासाठी बसवलेल्या नाहीत", महिला पोलिसाचे वाहनचालकांना खडेबोल
Pune women Traffic police

Pune News: नवले ब्रिज परिसरात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज परिसरात स्पीड गन देखील बसवल्या आहेत. मात्र तरी देखील वाहन चालक यातून पळवाट शोधत वेगाने वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एका महिला वाहतूक पोलिसाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या महिला पोलीस भगिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शितल आव्हाड असं या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

स्पीड गन पावत्या फाडण्यासाठी नाहीत

शितल यांनी वाहनचालकांना आवाहन करताना म्हटलं की, "कात्रज नवीन भोगदा आणि नवले ब्रिज ज्या स्पीड गन बसवल्या आहेत त्या फक्त तुमच्या पावत्या फाडण्यासाठी बसवलेल्या नाहीत. तर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी बसवल्या आहेत. काही वाहन चालक वेगाने गाडी घेऊन जातात आणि वर स्पीड गन दिसली की वाहनाचा वेग कमी करतात. तिथून हळू जातात आणि परत वेग वाढवतात. हे बरोबर आहे की चुकीचं आहे? प्रशासनाने जी वेग मर्यादा ठरवून दिली आहे त्याप्रमाणे चला."

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)

मोकळा रस्ता असेल तरी सावकाश चला

"कात्रज बोगदा सोडला की वाहनांचा वेग जरा कमी करा. 30 किमी प्रतितास वेगमर्यादा दिली आहे तर त्याच वेगाने चला. रस्ता मोकळा असेल तरी वाहने सावकाश चालवा. सर्वांनी मिळून जर मदत केली तर अपघात नक्कीच कमी होऊ शकतात", असं शितल आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर काही उपाययोजना प्रशासनाकडून करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या खालीलप्रमाणे,

  • नवले पूल परिसरात वाहनांची वेगमर्यादा 60 किलोमीटर वरुन 30 किलोमीटर प्रतितास करण्यात यावी.
  • रस्त्यावरील सूचना फलक, दिशादर्शकांची संख्या वाढवावी.
  • स्पीड गन्सची संख्या तीनऐवजी सहा करावी.
  • पीएमपीने अधिकृत बसथांबे उभारावेत.
  • यंत्रणांनी आपापल्या हद्दीतील अतिक्रमणे हटवावीत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com