देवा राखुंडे, प्रतिनिधी
Truck And Bike Accident CCTV Video : बारामती तालुक्यातील सुपे चौफुला मार्गावरील अहिल्याबाई चौकात मालवाहतूक ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना आज रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या या अपघाताचे थरारक दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील शेंडगेवाडा येथील रहिवासी होता. तर त्याचा भाऊ शुभम दत्तात्रय ठोंबरे हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही सख्खे भाऊ दुचाकी (क्र. एमएच 42 ई 1878) वरून घराकडे जात होते. अहिल्याबाई चौकातून पुढे वळण घेत असताना त्यांची दुचाकी घसरली. त्याचवेळी मोरगावच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक (क्र. एमएच 10 सीआर 4199) दुचाकीवरून गेला. या भीषण अपघातात सोमनाथ ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम ठोंबरे गंभीर जखमी झाले.
नक्की वाचा >>Mumbai News: मुंबईत खळबळ! वांद्र्याच्या 'या' प्रसिद्ध हॉटेलला ईडीचा दणका, प्रभादेवीतही मोठी प्रॉपर्टी जप्त
— Naresh Shende (@NareshShen87640) July 26, 2026
घटनेची माहिती मिळताच सुपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world