राहुल कुलकर्णी, पुणे
पुण्यातील सिटी पोस्ट परिसरातील पोस्ट ऑफिसच्या इतिहासकालीन इमारतीच्या समोर एक मोठं भगदाड पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्र्क या खचलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात कोसळला. हा ट्रक काही वेळाने बाहेर काढण्यात आला. मात्र तेथील भलामोठा खड्डा तसाच आहे. तो खड्डा एवढ्यात बुजवला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. तसेच हा खड्डा का पडला, येथे आधी विहीर होती का? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून घेतला जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ब्रिटिशकालीन मध्यवर्ती टपाल कार्यालयाच्या आवारातील जागेची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तोपर्यंत खड्ड्याची जागा बंदिस्त करण्यात आली असून, तेथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- दगडूशेठ गणपतीच्या काही अंतरावर भगदाड, ट्रकसह 2 दुचाकीही कोसळल्या, धक्कादायक CCTV Video )
जमीन खचून वाहन कोसळलेल्या या खड्ड्यातील पाणी स्वच्छ आहे. त्यामुळे येथे पूर्वी विहीर असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका आयुक्तांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर तेथे विहीर असावी असा अंदाज व्यक्त केला होता.
(नक्की वाचा - 'मर्सिडीस बेंझ'ला महाराष्ट्र शासनाची नोटीस, काय आहे नोटीसमध्ये?)
रस्ता का खचला असावा?
रस्ते का खचतात, याची प्रत्येक ठिकाणी विविध कारणे असू शकतात. शहरात इमारती बांधताना पाण्याचे नैसर्गिक झरे बुजवण्यात येतात. ते पाणी कोणत्या ना कोणत्या मार्गांने बाहेर पडत असते. त्यातून रस्ते खचण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे झरे अबाधित ठेवण्याची गरज आहे. सिटी पोस्ट येथील घटनेमागील कारण आताच सांगता येणार नाही. संबंधित इमारत ब्रिटीशकालीन आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात नैसर्गिक झरे मोठ्या प्रमाणात आहेत.