
भारतातील ट्रम्प ऑर्गनायझेशनचा परवानाधारक भागीदार असलेल्या ट्रिबेका डेव्हलपर्सने बुधवारी पुण्यात ट्रम्प वर्ल्ड सेंटरच्या बांधकामाची घोषणा केली. भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये या अमेरिकन कंपनीचे हे पहिले पाऊल आहे. 16 कोटी चौरस फूट क्षेत्रफळाचे हे केंद्र 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यातून 2500 कोटी रुपयांपर्यंतची विक्री होण्याची अपेक्षा ट्रिबेका डेव्हलपर्सला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या दशकात भारत अमेरिकेबाहेर ट्रम्प ब्रँडचा सर्वात मोठा रिअल इस्टेट बाजार बनला आहे. जिथे ट्रिबेकाने इतर स्थानिक विकासकांसह परवाना करारांतर्गत चार भारतीय शहरांमध्ये निवासी प्रकल्प विकसित करण्यास मदत केली आहे.
ट्रम्प वर्ल्ड सेंटर नावाचा हा ऑफिस प्रोजेक्ट पश्चिम भारतातील पुणे शहरातील रिअल इस्टेट कंपनी कुंदन स्पेसेसच्या सहकार्याने विकसित केला जाईल. जिथे गेल्या दशकात अनेक मोठ्या जागतिक आणि स्थानिक आयटी कंपन्यांनी कार्यालये स्थापन केली आहेत. हा प्रकल्प सुमारे चार वर्षांत पूर्ण होण्याचे नियोजन आहे, असे ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी मुंबईत दिलेल्या मुलाखतीत रॉयटर्सला सांगितले.
(नक्की वाचा - Smart Pension Plan: गुंतवणूक एकदा, आयुष्यभर फायदा! काय आहे LIC 'स्मार्ट' पेन्शन योजना'? पाहा A to Z माहिती)
या प्रोजेक्टमध्ये दोन काचेचे टॉवर बांधले जातील, ज्यामध्ये 27 मजल्यांपेक्षा जास्त कार्यालयीन जागा असेल. एका टॉवरमध्ये कायमस्वरूपी विक्रीसाठी ऑफिस स्पेस असतील. तर दुसऱ्या टॉवरमध्ये विविध व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी भाडेतत्त्वावर कार्यालये असतील, असे दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. या प्रकल्पांतर्गत जमीन, बांधकाम इत्यादी क्षेत्रात सुमारे 1600 कोटी ते 1700 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
(नक्की वाचा- Gold rate: दुबईपेक्षा नागपुरात सोनं स्वस्त, काय आहे कारण? जाणून घ्या हिशेब)
ट्रम्प ऑर्गनायझेशनचे भारतात मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे चार आलिशान निवासी प्रकल्प आहेत. मुंबई आणि पुणे प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि गुरुग्राम प्रकल्पासाठी कंपनीने ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) साठी अर्ज केला आहे. कोलकाता प्रकल्पही दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world