
मनोज सातवी, पालघर
पालघरमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दोन विद्यार्थिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. डहाणू तालुक्यातील सुखडआंबा गावात जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या टाकीच्या कठड्याचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींना जीव गमवावा लागला आहे. तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मृतांमध्ये हर्षदा रघु पागी (वय 11) आणि संजना प्रकाश राव (वय 12) यांचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत रीना रशू फरारा ही गंभीर जखमी झाली आहे. सुखडआंबा गावातील जिल्हा परिषद शाळा सुटल्यानंतर शाळेच्या जवळच असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवर या विद्यार्थिनी खेळण्यासाठी चढल्या होत्या.
(नक्की वाचा- Matheran News : माथेरान आजपासून बंद! पर्यटकांसाठी स्थानिकांनी उचलला आवाज)
मात्र टाकीच्या निकृष्ट बांधकामामुळे कठड्याचा स्लॅब कोसळला आणि या तीनही विद्यार्थिनी टाकीवरून खाली कोसळल्या. यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक विद्यार्थिनी मधे अडकल्याने ती गंभीर जखमी आहे.
(नक्की वाचा- Crime News: सेल्फीमुळे पकडला गेला चोर, उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच साधत होता डाव)
दरम्यान या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या टाकीचे निकृष्ट बांधकाम केल्यामुळे संतापाचे वातावरण आहे. संबंधित बांधकाम ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल दाखल करावा. या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world