राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik Leopard Viral Video : नाशिकच्या निफाड तालुक्यातील मुखेड येथे दोन बिबट्यांचा मुक्तसंचारामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुखेड-गोंडेगाव रस्त्यावर ऊस आणि द्राक्षाच्या शेतात फिरणाऱ्या दोन बिबट्यांना काही नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात त्यांचे चित्रीकरण केले.हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
निफाड बनले बिबट्याचे हब
निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बागायत क्षेत्र तसेच उसाचे मळे असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर होत असतो.या उसांच्या शेतात वर्ष वर्ष शेतकरी जात नाही.त्यामुळे बिबट्यांच्या प्रजननासाठी अनुकूल वातावरण असल्याने बिबट्यांच्या संख्या वाढत असते.
नक्की वाचा >> Maharashtra Rain: मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस, घराबाहेर जाणाऱ्यांनी या तारखांना राहा अलर्ट
नागरिक आणि बिबट्यांचा होतो संघर्ष
अचानक बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन नात्याचे झाले अनेकदा बिबट्याचे हल्लेही वाढले आहे.बिबट्यांना जेरबंद करण्याच्या घटनाही वाढल्या आहे.अनेकदा तर नागरिकच बिबट्याला जेरबंद करून वनविभागाच्या ताब्यात देत असल्याच्या घटना समोर आल्या.