जाहिरात

Sambhajinagar Bus Accident: छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, MIDC चे 35 कामगार जखमी

छत्रपती संभाजीनगर-वाळूज मार्गावरील छावणी उड्डाणपुलावर रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Sambhajinagar Bus Accident: छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, MIDC चे 35 कामगार जखमी
Sambhajinagar Bus Accident News Today

Chhatrapati Sambhajinagar Bus Accident News: छत्रपती संभाजीनगर-वाळूज मार्गावरील छावणी उड्डाणपुलावर रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुसऱ्या शिफ्टनंतर वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीतील कामगारांना घरी घेऊन जाणारी खासगी बस उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीवर जोरात धडकली.या भीषण अपघातात बस चालक जाधव यांचा मृत्यू झाला असून जवळपास 35 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की चालक बसच्या केबिनमध्ये अडकला होता.नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि मदत पथकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून सर्व जखमींना विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले.काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

नक्की वाचा >> Ratnagiri News: कोकणात जाताना जरा जपूनच, या' रस्त्यावर खतरनाक प्राण्याच्या कळपाचा मुक्तसंचार, शेतकरीही घाबरले

सर्व प्रवासी वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीचे कामगार

दरम्यान,घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जखमी कामगारांनी सांगितले की,बसमधील सर्व प्रवासी वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीचे कामगार होते,अशी माहिती काही कामगारांनी दिली.या अपघाताचे नेमके कारण आणि उड्डाणपुलावर ऊसाने भरलेली ट्रॉली कशा परिस्थितीत उभी होती,याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com