Maharashtra Rain Alert : मुंबई शहरासह रायगड,ठाणे,पालघर,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे.तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा,पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मोठं आवाहन
नागरिकांनी या काळात सतर्क राहावे.विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह रायगड,ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
नक्की वाचा >> Ambarnath News: 'भ्रष्टाचार-चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे', अंबरनाथ पालिकेच्या उपनगराध्यक्षांचं खळबळजनक विधान
Here It felt like Cloud Burst https://t.co/JZjdCtel5E
— Disciplined N Consistent (@AnnuInfo) July 2, 2026
पावसाचे पाणी घरात शिरले अन्..
ठाणे विभागात पावासाने धुमाकूळ घातल्याने शिळफाटा-मुंब्रा मार्ग जलमय झाला होता.कल्याणसह उल्हासनगरमध्येही नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती.मुंबईत दमदार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचलं आहे. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
नक्की वाचा >>Sambhajinagar Bus Accident: छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, MIDC चे 35 कामगार जखमी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world