'महाराष्ट्र बंद मागे, पण...', उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मला आनंद आहे की उच्च न्यायालयाने उद्याच्या महाराष्ट्र बंदवर तातडीने निर्णय दिली आहे. महाराष्ट्र बंदबाबत जी तत्परता उच्च न्यायालयाने दाखवली आहे, तशीच तत्परता जे गुन्हे घडत आहेत त्या आरोपींना आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी दाखवावी.

Advertisement
Read Time: 2 mins

बदलापूर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीने शनिवारी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने या बंदला मनाई केली आणि बंद बेकायदेशीर ठरवल्याने महाविकास आघाडीने देखील एक पाऊल मागे घेतलं आहे. शरद पवार यांच्या आवाहनानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचा निर्णयावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "मला आनंद आहे की उच्च न्यायालयाने उद्याच्या महाराष्ट्र बंदवर तातडीने निर्णय दिला आहे. महाराष्ट्र बंदबाबत जी तत्परता उच्च न्यायालयाने दाखवली आहे, तशीच तत्परता जे गुन्हे घडत आहेत त्या आरोपींना आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी दाखवावी."

"माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, मात्र न्यायालयाचा आम्ही आदर राखत आहोत. त्यामुळे उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत. उद्याचा बंद मागे घेतला असला तरी राज्यातील शहरांमध्ये, गावांमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हाताला आणि तोंडाला काळ्या फिती बांधून उभे राहतील", असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा - उद्याचा 'महाराष्ट्र बंद' मागे घ्या, शरद पवार यांचं महाविकास आघाडीला आवाहन)

देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक आहे की नाही?

"शरद पवार साहेबांनीसुद्धा आवाहन केलं आहे. त्यामुळे आम्ही उद्याचा बंद मागे घेतो. मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात मुख्य चौकात महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती आणि हातात काळे झेंडे घेऊन निषेध करतील. एकूणच या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही गोष्ट शिल्लक आहे की नाही? मोर्चे, संप यांना देखील बंदी केली आहे का? लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का? यावर घटनातज्ज्ञांना आपली मते तत्परतेने मांडली पाहिजेत. 

(नक्की वाचा-  मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, हायकोर्टाचा निर्णय)

शिवसेना भवनाच्या चौकात करणार आंदोलन

मी उद्या शिवसेना भवनाच्या चौकात तोंडाला काळी फित बांधून आणि हातात काळा झेंडा घेऊन सकाळी 11 वाजता बसणार आहे. त्याला तरी कुणी मनाई करणार नाही. मात्र त्याला मनाई होणार असेल तर मला जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्याशिवाय पर्याय नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.