"उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी काँग्रेससोबत युती केली", एकनाथ शिंदेंचा घणाघात

आमच्या सरकारने गेल्या दोन वर्षांत जनतेसाठी काम केले. दोन वर्षात आम्ही केलेल्या कामाचे कौतुक खुद्द पंतप्रधान मोदींनी केले याचा मला आनंद आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ही एकाच विचारसरणीची सरकारे आहेत. याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. मी मुख्यमंत्री म्हणजे 'कॉमन मॅन', असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनेत फूट का पडली याबाबतही एकनाथ शिंदे यांनी पुनरुच्चार केला. उद्धव ठाकरेंना स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेससोबत युती केली, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला. 

राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा मीही त्यांच्यासोबत होतो. ते सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरोधात होते. मी उद्धव ठाकरेंना खूप समजावलं, पण मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी काँग्रेससोबत युती केली. काँग्रेसला दूर ठेवा, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आमच्या पक्षाचे नुकसान होत होते, आमचा पक्ष संपण्याच्या मार्गावर होता. त्यामुळेच आम्ही सरकार उलथवून शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : 'मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जीना', भाजपा नेत्याची खरमरीत टीका )

आमच्या सरकारने गेल्या दोन वर्षांत जनतेसाठी काम केले. दोन वर्षात आम्ही केलेल्या कामाचे कौतुक खुद्द पंतप्रधान मोदींनी केले याचा मला आनंद आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ही एकाच विचारसरणीची सरकारे आहेत. याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. मी मुख्यमंत्री म्हणजे 'कॉमन मॅन', असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,"महायुती सरकारने महाविकास आघाडीच्या राजवटीत रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. या सरकारच्या काळात जीडीपी, एफडीआय, जीएसटी किंवा स्वच्छता अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल होता.आमच्या सरकारच्या काळाता राज्यात 5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली. वैयक्तिक फायद्यापेक्षा आम्ही लोकांच्या हिताला प्राधान्य दिल्याचा मला अभिमान आणि आनंद वाटतो. 

Advertisement

महाराष्ट्रात जेव्हापासून डबल इंजिनचे सरकार आले तेव्हापासून राज्याला केंद्राकडून अनेक फायदे मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महायुती सरकारच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. मी सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी, लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

( नक्की वाचा : मुंबईत 20 टक्के मुस्लीम पण तिकीट देण्यात कंजुषी का? बड्या नेत्याची नाराजी, MVA ला फटका बसणार? )

मुख्यमंत्री होणे म्हणजे जनतेची सेवा करणे आणि केवळ फेसबुक लाईव्हद्वारे सरकार चालवणे नव्हे. आमचे सरकार शेतकऱ्यांना प्राधान्य देते, मदत आणि आधार देते. आम्ही शेतकऱ्यांसाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि विविध योजना राबवल्या आहेत. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. मला अभिमान आहे की आमचे सरकार लोकांच्या समस्या समजून घेत आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. 

Advertisement

Topics mentioned in this article