जाहिरात

Udit Narayan : 'उदित नारायण यांनी माझ्यामागे गुंड लावले,' पहिल्या पत्नीचा खळबळजनक दावा

Udit Narayan Wife : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण आणि त्यांच्या पहिल्या पत्नीमधील वादावर मुंबईतील कौटुंबीक न्यायालयात सुनावणी सुरु आहे.  

Udit Narayan : 'उदित नारायण यांनी माझ्यामागे गुंड लावले,' पहिल्या पत्नीचा खळबळजनक दावा
मुंबई:

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण आणि त्यांच्या पहिल्या पत्नीमधील वादावर मुंबईतील कौटुंबीक न्यायालयात सुनावणी सुरु आहे.  नारायण यांची पहिली पत्नी रंजना नारायण झा यांनी 2022 साली याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान त्यांनी आपल्याला पतीसोबत राहायचं आहे, असं मत व्यक्त केलं. कोर्टात आज (गुरुवार, 21 फेब्रुवारी) झालेल्या सुनावणीला नारायण उपस्थित होते. नारायण यापूर्वी अनेकदा सुनावणीसाठी अनुपस्थित होते. त्यामुळे कोर्टानं त्यांना 10 रुपये दंड सुनावला होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कौटुंबीक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहुल उपाध्याय यांनी उदीत नारायण यांना 28 जानेवारी 2025 पर्यंत उत्तर देण्याची अंतिम मुदत दिली होती. रंजनाचे वकील अजय कुमार यांनी सांगितलं की, त्यांच्या आशिलाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या हक्काचं संरक्षण होईल अशी आम्हाला आशा आहे.

रंजना नारायण झा यांनी सांगितलं की, त्यांना त्यांच्या पतीसोबत राहायचं आहे. वय आणि आरोग्याचा विचार करुन आता मला त्यांच्याबरोबर आयुष्य व्यतीत करायचं आहे. मी जेव्हा उदीत नारायण यांना भेटायला मुंबईत जाते त्यावेळी त्यांचे मागे गुंड लावले जातात. कोर्टातील सुनावणीच्यानंतर रंजना यांनी सांगितलं की आज उदीत नारायण यांनी या विषयावर तडजोड करण्यास नकार दिला आहे. त्यांनी हा खटला लढणार असल्याचं सांगितलं आहे. 

( नक्की वाचा : Udit Narayan उदित नारायणनं भर कार्यक्रमात महिला फॅन्ससोबत केले अश्लील वर्तन, फॅन्स संतापले Video )
 

मला लग्नानंतर कधीही पत्नीचा दर्जा मिळाला नाही, असा दावा रंजना यांनी केला. मला माझ्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात कोर्टाकडून मला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणावर गायक उदीत नारायण यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: