VIDEO: "लोक नगरसेवक व्हायच्या आधीच...", मुरलीधर मोहोळांनी स्वत: लावला नगरसेवकाच्या ऑफिसचा बोर्ड

पुण्याचे नगरसेवक सुनील पांडे यांनी महिनाभर पदभार स्वीकारूनही कार्यालयावर बोर्ड लावला नव्हता. अखेर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः बोर्ड बनवून घेत तो त्यांच्या कार्यालयात लावला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: राजकारणात पद मिळालं की लगेच प्रसिद्धीची झोत आपल्याकडे खेचण्यासाठी फलकबाजी आणि बॅनरबाजीची चढाओढ लागलेली आपण पाहतो. मात्र, पुण्यातील कोथरूडमध्ये एक उलटाच प्रकार पाहायला मिळाला. नवनिर्वाचित नगरसेवक सुनील पांडे यांनी नगरसेवक होऊन महिना उलटला तरी आपल्या जनसंपर्क कार्यालयावर 'नगरसेवक' असल्याचा फलक लावला नव्हता. ही बाब केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या लक्षात येताच त्यांनी जे केले, त्याची आता चर्चा होत आहे.

काय घडला नेमका प्रकार?

मुरलीधर मोहोळ हे कोथरूड परिसरातील आपल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत असताना सुनील पांडे यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांना दिसले की कार्यालयावर अद्यापही सुनील पांडे यांच्या पदाचा कोणताही अधिकृत बोर्ड लावलेला नाही. साधेपणाने काम करण्याच्या नादात सुनील पांडे यांनी हा बोर्ड लावला नव्हता.

(नक्की वाचा-  Bhigwan Kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणात भाजप आमदाराचा हात? मुलीच्या आईचे गंभीर आरोप)

मंत्र्यांनी स्वतः लावला फलक

मोहोळ यांनी केवळ सूचना देऊन न थांबता, स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी तत्काळ बोर्ड बनवून घेतला आणि सुनील पांडे यांच्या कार्यालयात जाऊन तो स्वहस्ते लावला. बोर्ड लावताना मोहोळ यांनी हसत हसत पांडे यांना टोला लगावला. ते म्हणाले, "अरे, लोक नगरसेवक व्हायच्या अगोदरच बोर्ड तयार करून ठेवतात आणि तू नगरसेवक होऊन महिना झाला तरी अजून बोर्ड लावला नाहीस!"

Advertisement

(नक्की वाचा-  Bhandara News: घरात आईचे पार्थिव, डोळ्यांत अश्रू... पण मुलाने स्वत:ला सावरत दिला बोर्डाचा पेपर)

मोहोळ यांच्या साधेपणाची चर्चा

सुनील पांडे हे मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक मानले जातात. "साहेबांनी स्वतः माझ्या कार्यालयात येऊन हक्काने बोर्ड लावणे, हे माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या सन्मानापेक्षा कमी नाही," अशा भावना पांडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. 
 

Topics mentioned in this article