जाहिरात

Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, 'या' पिकांचं होणार मोठं नुकसान, कारण काय?

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात युरिया खताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आलं आहे.

Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, 'या' पिकांचं होणार मोठं नुकसान, कारण काय?
Pune Farmers latest News
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Farmers News Today :  पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात युरिया खताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. कुंजीरवाडी परिसरासह अनेक भागांत साठा संपल्याने हजारो शेतकऱ्यांना गेल्या एक महिन्यापासून खतासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.यामुळे गहू,ऊस आणि पालेभाज्या उत्पादक शेतकरी चिंतेत असून, खत न मिळाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिका–इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा थेट परिणाम खत उपलब्धतेवर झाल्याचे दिसत आहे.होर्मुझ सामुद्रधुनीजवळील तणावामुळे एलएनजी,अमोनिया आणि सल्फर यांसारख्या कच्च्या मालाचा पुरवठा अडथळ्यात आला आहे.परिणामी,युरिया उत्पादनात घट झाली असून स्थानिक पातळीवर टंचाई जाणवत आहे. दरम्यान,डीएपी खताच्या ५० किलोच्या पोत्यामागे सुमारे ५०० रुपयांची वाढ झाली असून महागाईचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. IFFCO सह प्रमुख उत्पादन प्रकल्पांना गॅस पुरवठा ७० टक्क्यांवर आल्याने उत्पादन कमी करावे लागत आहे.

नक्की वाचा >> Mumbai News: 40 वर्षांपासून CSMT स्टेशनवर मागितली भीख, मुंबईचा हा व्यक्ती बनला जगातील सर्वात श्रीमंत भिकारी

"शेतकऱ्यांना घाबरून न जाता आवश्यकतेनुसारच खत खरेदी करा"

मात्र, प्रशासनाकडून याबाबत वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे. जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. २०२५-२६ हंगामासाठी मंजूर ७४,००० मेट्रिक टनांपैकी ७०,२४९ मेट्रिक टन पुरवठा पूर्ण झाला असून, मागील हंगामातील १३,३४७ मेट्रिक टन शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाबरून न जाता आवश्यकतेनुसारच खत खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, प्रत्यक्षात उपलब्धता आणि वितरण यामध्ये तफावत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

  • हवेली तालुक्यात युरिया खताचा साठा संपल्याची स्थिती
  • कुंजीरवाडी परिसरात शेतकऱ्यांना महिनाभरापासून हेलपाटे
  • गहू, ऊस, पालेभाज्या पिकांवर मोठा परिणाम
  • जागतिक तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत
  • DAP खताच्या किमतीत ५०० रुपयांपर्यंत वाढ
  • गॅस पुरवठा ७०% वर आल्याने उत्पादन घट
  • प्रशासनाचा दावा – पुरेसा साठा उपलब्ध
  • प्रत्यक्षात वितरणात अडचणी, शेतकरी संकटात
  • खरीप हंगामापूर्वी टंचाई वाढण्याची भीती

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com