Hormuz World War Iran Israel USA War : पश्चिम आशियात सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून तो अधिक घातक आणि भायवह होत असल्याचं पाहायला मिळत आहे.जवळपास दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या या भीषण युद्धात मनुष्यहानी आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.आता युद्धाची स्थिती एका निर्णायक मोडवर पोहोचली आहे. वाढत्या तणावाची परिस्थिती लक्षात घेता अमेरिकेनं आता थेट होर्मुजवर हस्तक्षेप केला आहे. अमेरिकेनं त्यांचे खतरनाक मरीन कमांडो मैदानात उतरवले आहेत. अमेरिकन सेनेच्या या सक्रिय सहभागामुळे असं म्हटलं जातंय की, ही तणावपूर्ण परिस्थिती आता महायुद्धात बदलण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनं त्यांच्या एमफिबीएस स्ट्राईक ग्रुपवर यूएसएस त्रिपोलीला स्ट्रेट ऑफ हॉर्मुज परिसराच्या दिशेनं पाठवलं आहे.हे जहाज पाणी आणि जमिन दोन्ही जागेवर ऑपरेशन करू शकतं. यामध्ये जवळपास 2500 मरिन कमांडो सामील आहेत. हे सैनिक जमिनीवरच्या लढाई आणि वेगवान हल्ल्यांसाठी ओळखले जातात. यामुळे असा अंदाज लावला जातोय की,अमेरिका आता त्यांच्या आर्मीलाही युद्धात उतरवू शकते.
नक्की वाचा >> Pune News : लग्न जुळवणाऱ्या शादी डॉट कॉमवर महिलेची फसवणूक, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
रिपोर्टनुसार, मरिन कमांडोसोबत अमेरिका सुरक्षा विभाग पेंटागन 31 वे मरीन एक्सपेडिशनरी यूनिटलाही तैनात करत आहे. हे यूनिट अचानक हल्ला करणे आणि धडाडीचे निर्णय घेण्यात माहीर असतात. आता यूएसए त्रिपोली जपानमध्ये तैनात आहे. तिथून एक दोन आठवड्यांत हे अमेरिकेच्या सेंट्रल कमांड परिसरात पोहचेल, असं सांगितलं जातंय. पश्चिम एशियामध्ये आधीपासूनच अमेरिकेचे 50 हजारांहून जास्त सैनिक उपलब्ध आहेत.
नक्की वाचा >> Raigad News: शिवप्रेमींसाठी दु:खद बातमी! किल्ले रायगडच्या 'या' भागाला लागली आग, वणवा पसरला अन् पुढं जे घडलं..
काय आहे यूएसए त्रिपोली?
यूएसए त्रिपोली अमेरिकी नौदलाचा मोठा हल्ला करणारा जहाज आहे. याचसोबत एक गाएडेड मिसाईल क्रूझर यूएसएस रोबर्ट स्मॉल्स आणि एक डिस्ट्रॉयर यूएसएस राफेलही सामील आहे. क्रूझर मोठे लढाऊ जहाज असतात. यामध्ये मोठे हत्यार आणि हेलिकॉप्टर असतात. हे पाणबुडींच्या विरोधातील मिशनमध्येही महत्त्वाची भूमिका पार पडतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world