जाहिरात

Iran War: "मी नसतो तर जेलमध्ये सडत असता!" डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवर बेंजामिन नेतान्याहू यांना घातल्या शिव्या

या कारवाईमुळे इराणसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेला खीळ बसू शकते, अशी भीती ट्रम्प यांना आहे.

Iran War: "मी नसतो तर जेलमध्ये सडत असता!" डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवर बेंजामिन नेतान्याहू यांना घातल्या शिव्या
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना फटकारले
  • ट्रम्प यांना हिजबुल्लाहविरुद्ध वाढवलेल्या लष्करी कारवाईमुळे प्रचंड नाराजी आहे
  • ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना वेडा आणि कृतघ्नपणा करणारा म्हणून थेट संबोधले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Israel Lebabon Attack and Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ट्रम्प यांनी एका फोन कॉल दरम्यान नेतान्याहू यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे वृत्त आहे. 'एक्सिओस' या अमेरिकन वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरुद्ध इस्रायलने वाढवलेल्या लष्करी कारवाईमुळे ट्रम्प प्रचंड नाराज आहेत. या कारवाईमुळे इराणसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेला खीळ बसू शकते, अशी भीती ट्रम्प यांना आहे. त्यामुळे त्यांनी नेतान्याहू यांची कानउघाडणी केली आहे. 

नक्की वाचा - Pune News: लुप्त झालेलं गाव धरणाच्या पोटातून बाहेर आलं, गावकरी झाले भावूक, गाव पाहण्यासाठी मोठी गर्दी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना थेट 'वेडा' (F***ing Crazy) असे संबोधले आहे. "तू पूर्णपणे वेडा झाला आहेस. जर मी नसतो तर तू आज जेलमध्ये असतास. मी तुला वाचवतोय आणि तू कृतघ्नपणा करत आहेस. तुझ्यामुळे आज संपूर्ण जग इस्रायलचा तिरस्कार करत आहे," अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना सुनावले. नेतान्याहू यांच्यावर इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यांचा संदर्भ देत ट्रम्प यांनी ही टीका केली. तसेच बैरुतवरील नियोजित हवाई हल्ले रोखण्याचे आदेशही ट्रम्प यांनी दिले आहेत.

नक्की वाचा - Big News: भाजपला मोठा धक्का बसणार? बडा नेता बंडाच्या तयारीत, स्वत:चा पक्ष काढणार

दरम्यान, ट्रम्प यांनी इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्धबंदी लागू झाल्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच लेबनॉनमधून उत्तर इस्रायलच्या दिशेने 2 रॉकेट डागण्यात आले. इस्रायली हवाई दलाने (IAF) हे दोन्ही रॉकेट हवेतच नष्ट केले. रात्री 1:35 च्या सुमारास उत्तर इस्रायलमध्ये धोक्याचे सायरन वाजले होते. या हल्ल्यामुळे ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेतान्याहू आपलं ऐकत नाहीत यामुळे ट्रम्प संतप्त झाल्याचं वृत ही 'एक्सिओस' या वृत्तसंस्थेने दिले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com