वलसाड मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजरमधील डबल डेकर डबे बंद केल्यानंतर या गाडीतून नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. डहाणूपासून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची असलेल्या वलसाड मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर गाडीत प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळात आबे. या गाडीत प्रवाशांना जीव धोक्यात घालून लटकून प्रवास करण्याची वेळ आली आहे. या गाडीच्या डबल डेकर डबे काढून इतर गाड्यांप्रमाणे सामान्य डबे जोडल्याने गर्दी वाढल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पश्चिम रेल्वेने वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीच्या डबल डेकर डब्यांचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याचे कारण देत डबल डेकर डबे हद्दपार केले. मात्र आज या गाडीला अक्षरशः बाहेरून गंजलेले डबे जोडल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुस्थितीत असलेले डबल डेकर डबे काढून भंगार डबे जोडण्यामागे रेल्वेचा काय उद्देश आहे असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. डबल डेकर डबे कमी केल्याने या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
नक्की वाचा - Crime News: 5 वर्षात दुप्पट, 10 वर्षात चौपट! असा गेम केला की 3 लाख लोकांना 500 कोटींचा गंडा घातला
डबल डेकर डब्यांमध्ये प्रवाशांची आसन व्यवस्था जास्त होती आणि उभे राहण्यासाठी मोकळी जागा जास्त असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येत होता. मात्र 4 जानेवारी रोजी डबल डेकर डब्यांचा अखेरचा दिवस होता. रविवारपासून डबल डेकर डब्यांऐवजी इतर एक्सप्रेस, शटल आणि पॅसेंजर गाडीप्रमाणे डबे जोडण्यात आले आहेत. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. डबल डेकर डबे हटविण्याच्या निर्णयाचा विरोध करत पालघर मधील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world