'लाडक्या बहिणी'साठी वर्षा गायकवाडांनी पदर खोचला, निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नवा चेहरा

वर्षा गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांना धारावी विधानसभेतून उमेदवारी देण्याच्या तयारीला वेग आला आहे. 

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

वर्षा गायकवाड यांच्या बहीण ज्योती गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघातून वर्षा गायकवाड खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत. खासदार झाल्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कडे देखील सुपूर्द केलाय. 

त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्यानंतर धारावी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. आता या जागेवर वर्षा गायकवाड या आपल्या बहिणीसाठी फिल्डिंग लावत असल्याचं दिसतंय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसकडे अनेक इच्छुकांची यादी आली आहे. मात्र धारावी हा गायकवाड कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. आणि यापुढेही तो गायकवाड कुटुंबीयांकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

नक्की वाचा - पैठण विधानसभेत कोणाची सरशी? मविआ की महायुती? काय सांगतो मतदारसंघाचा इतिहास

त्यामुळे वर्षा गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांना धारावी विधानसभेतून उमेदवारी देण्याच्या तयारीला वेग आला आहे. आता गायकवाड कुटुंबातून राजकारणात सक्रिय होऊ पाहणारं अजून एक नाव समोर आलं आहे.