जाहिरात

Vasai News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत; लोखंडी ब्रिजमध्ये अडकला भरधाव डम्पर, विचित्र अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई तालुक्यातील कोपर फाटा येथे एक अत्यंत विचित्र अपघात घडल्याचं समोर आलं आहे.

Vasai News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत; लोखंडी ब्रिजमध्ये अडकला भरधाव डम्पर, विचित्र अपघात

Vasai News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई तालुक्यातील कोपर फाटा येथे एक अत्यंत विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या लोखंडी ब्रिजच्या स्ट्रक्चरमध्ये एक भरधाव डम्पर थेट हवेत अधांतरी अडकला आहे. या अपघातामुळे मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.

नेमका अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, डम्पर चालकाकडून चुकून हायड्रोलिक सिस्टिमचे बटण दाबले गेले. यामुळे चालत्या डम्परची पाठीमागील बाजू अचानक वर उचलली गेली. डम्पर भरधाव वेगात असल्याने, वर उचललेला भाग थेट कोपर फाटा येथील मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या लोखंडी ब्रिजला जाऊन जोरात धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, डम्पर रस्ता आणि ब्रिजच्या लोखंडी स्ट्रक्चरच्या मध्ये अत्यंत धोकादायक अवस्थेत अडकून पडला. डम्परची हायड्रोलिक सिस्टिम चुकून सुरू झाल्याने हा संपूर्ण अपघात घडल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

नक्की वाचा -  रस्त्यांवर भीक मागत होता मेडिकलचा विद्यार्थी, ते दृश्य पाहताच बाप हादरला; मुंबईतील भयंकर वास्तव

वाहतुकीवर मोठा परिणाम

या विचित्र अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेची एक लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. महामार्गाच्या मध्योमध डम्पर अशा पद्धतीने अडकल्यामुळे या मार्गावरील वाहनांच्या वेगाला ब्रेक लागला असून, वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सध्या घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणा आणि हायड्रोजन क्रेन पाचारण करण्यात आल्या असून, अडकलेला डम्पर बाहेर काढण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com