जाहिरात
Story ProgressBack

मुंबई-अहमदाबाद हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा, 3 महिन्यांत अपघातांची शंभरी, जबाबदार कोण?

Mumbai-Ahmedabad National Highway: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. 25 एप्रिलला देखील दूध टँकर उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. का होत आहेत येथे अपघात?

Read Time: 2 min
मुंबई-अहमदाबाद हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा, 3 महिन्यांत अपघातांची शंभरी, जबाबदार कोण?

मनोज सातवी/पालघर

Mumbai-Ahmedabad National Highway: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवण्यात येत नसल्याने प्रवासी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. याच महामार्गावर गुरुवारी (25 एप्रिल) दुधाने भरलेला टँकर उलटून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात चालकाचा वाहनाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास वाडा खडकोना येथे हा अपघात झाला. टँक उलटून महामार्गावर सर्वत्र दूध पसरल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गुजरातमधून निघालेला हा टँकर मुंबईच्या दिशेने येत असताना दुर्घटना घडली आणि यामुळे परिसरातील वाहतूक देखील ठप्प झाली. 

(नक्की वाचा: दारू पिऊन आईवडिलांना मारायचा मुलगा, कंटाळलेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल)

अपघातांच्या मालिकेमागे आहे हे कारण?

दरम्यान मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे (White taping) काम सुरू आहे, यामुळेच अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेपासून ते दहिसर चेक नाक्यापर्यंत कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पण या कामामध्ये कोणतेही नियोजन नसल्याने महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू आहे. प्रवाशांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. एकूणच हा महामार्ग सर्वसामान्यांकरिता मृत्यूचा सापळा ठरत आहे. 

(नक्की वाचा: अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ! सायबर सेलने बजावले समन्स, काय आहे कारण?)

प्रवासी जीव मुठीत घेऊन करताहेत प्रवास  

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. कामामध्ये नियोजनाचे अभाव असल्याने येथे दररोज अपघात घडत असल्याचा आरोप केला जात आहे. महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना तसेच वाहतुकीशी संबंधित कोणतेही नियोजन न करण्यात आल्याने व्हाइट टॅपिंगचे काम तातडीने बंद करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.    

(नक्की वाचा: मतदानापूर्वीच हिंसाचार, लग्नसोहळ्यावरून परतणाऱ्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या)

जानेवारी 2024 ते मार्च 2024 या तीन महिन्यांची अपघातांची आकडेवारी

अछाड (महाराष्ट्र - गुजरात सीमा) ते वर्सोवा खाडी पूल या 117 किलोमीटर अंतरामध्ये झालेल्या अपघातांची आकडेवारी  

  • एकूण झालेल्या अपघातांची संख्या - 107
  • अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या - 58
  • अपघातात जखमी  झालेल्यांची संख्या - 41
  • एप्रिल महिन्यामध्ये अपघातांमध्ये अधिक भर पडली आहे.

    VIDEO: राजकीय धुळवडीत स्थानिकांना भेडसावतोय 'धुळी'चा त्रास

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
    Our Offerings: NDTV
    • मध्य प्रदेश
    • राजस्थान
    • इंडिया
    • मराठी
    • 24X7
    Choose Your Destination