
मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai-Virar City Municipal Corporation : प्रत्येक शहरात मोठमोठी मैदानं असायला हवीत. मुलांनी ऑनलाइन गेमला मागे टाकून मैदानी खेळ खेळावेत अशी शाळांमधूनही शिकवण दिली जाते. वसई-विरार पालिकेने मात्र मैदान असतानाही खेळण्याचं आणि व्यायामाचं साहित्य स्मशानभूती लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
वसई-विरार शहर महापालिकेच्या नियोजनशून्य, असंवेदनशील आणि भोंगळ कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. वसई-विरार शहर पालिकेच्या उद्यान विभागाने वसईतील बेणापट्टी गावातल्या स्मशानभूमीतच चक्क खेळण्याचे आणि व्यायामाचे साहित्य बसवले आहे. आता स्मशानभूमीतच अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनी या ठिकाणी खेळवायचे की व्यायाम करायचा..?

नक्की वाचा - Pune Metro 3 News: माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी, पुणेकरांसाठी आनंदवार्ता
महत्त्वाचं म्हणजे आजुबाजुला मैदानं असतानाही मुलांनी स्मशानभूमीत येऊन खेळायचे का..? असा प्रश्न आता विरार वसईकरांना पडला आहे. प्रत्यक्षात त्या भागात मैदानं आहे. तरीही पालिकेने व्यायाम आणि खेळण्याचे साहित्य स्मशानभूमीत बसविल्याने वसईकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेने हे साहित्य लवकरात लवकर स्मशानभूमीतून हटवून मैदानात लावावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world