
मनोज सातवी, मुंबई: मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची अंमली पदार्थां विरोधात धडाकेबाज कारवाई केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी एमडी ड्रग बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल ₹12,000 कोटींचा कोटींचा कच्चा माल जप्त केला आहे. मीरा भाईंदर पोलिसांनी हैद्राबादमध्ये जावून एमडी ड्रग फॅक्टरीचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी 12 जणांना अटक केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस दलाने थेट हैद्राबाद येथे चालणाऱ्या एका मोठ्या ड्रग फॅक्टरीचा भांडाफोड केला आहे. क्राईम ब्रांच युनिट 4 चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने हैद्राबादमध्ये छापा टाकून तब्बल ₹12,000 कोटींचा कच्चा माल जप्त केला. हा माल एमडी (Methylenedioxy Methamphetamine) या अत्यंत धोकादायक सिंथेटिक ड्रगच्या उत्पादनासाठी वापरला जाणार होता.
Akola News : अकोल्यात वंचितच्या नेत्याच्या मुलावर 7 वार; संतप्त समर्थकांकडून आरोपीचे वाहन जाळून हल्ला
या छाप्यात पोलिसांनी 12 आरोपिंना अटक केली असून मोठ्या आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय रॅकेटचा कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या संदर्भाने केलेल्या मोठ्या कारवाईबाबतच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, निकेत कौशिक हे या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत.
कारवाईत मोठा साठा जप्त
या कारवाईत पोलिसांना 32,000 लिटर एवढा कच्चा माल मिळून आला आहे. या कच्च्या मालापासून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग तयार होऊ शकले असते. पोलिसांच्या मते, जप्त करण्यात आलेल्या मालाचा अंदाजित बाजारभाव तब्बल ₹12,000 कोटी इतका आहे.
कारवाईत 12 जणांना अटक
या छाप्यात पोलिसांनी 12 संशयितांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या कारखान्यामागे कार्यरत असलेल्या मोठ्या आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे या मोठ्या कारवाईमुळे ड्रग माफियांना मोठा धक्का मनाला जात आहे.
( नक्की वाचा : Pune News : गणेश विसर्जन पूर्वसंध्येला पुणे हादरलं; नाना पेठेत गँगवॉर, कुख्यात आरोपीच्या मुलाचा खून )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world