Vasai Virar Election Results 2026: हितेंद्र ठाकुरांनी गड राखला; बविआची सत्तेकडे वाटचाल, भाजपला मोठा धक्का

Vasai Virar Election Result: गेल्या ३५ वर्षांपासून या क्षेत्रावर पकड असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (BVA) ६१ जागा जिंकून पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Vasai Virar Election Result: वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत बहुजन विकास आघाडीने (BVA) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ११५ जागांच्या या महापालिकेत बहुजन विकास आघाडीने बहुमताचा आकडा पार केला असून, हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचाच महापौर बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

वसई-विरार महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. गेल्या ३५ वर्षांपासून या क्षेत्रावर पकड असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (BVA) ६१ जागा जिंकून पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या आहेत. भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार टक्कर दिली असली तरी त्यांना केवळ २४ जागांपर्यंतच मजल मारता आली.

(नक्की वाचा-  Jalgaon News: तुरुंगातून निवडणूक लढली आणि जिंकलीही; शिंदे गटाच्या ललित कोल्हेंची राज्यभर चर्चा)

निकालातील महत्त्वाचे मुद्दे

११५ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत सत्तेसाठी ५८जागांची आवश्यकता होती. बविआने ६१ जागा जिंकत हा आकडा आरामात पार केला आहे. माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आपला विजय कायम राखला आहे. मात्र प्रभाग क्रमांक ५ मध्ये बहुजन विकास आघाडीला मोठे धक्के बसले आहेत. हितेंद्र ठाकूर यांचे चुलत भाऊ आणि माजी सभापती पंकज ठाकूर तसेच माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांचा पराभव झाला आहे.

(नक्की वाचा-  BMC Election 2026: भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी! ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा दारूण पराभव)

माजी महापौर रुपेश जाधव पराभूत

या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे माजी महापौर रुपेश जाधव यांचा झालेला पराभव. पराभवानंतर जाधव यांनी निकालावर शंका उपस्थित केली असून, त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पुन्हा मतमोजणी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या प्रभागाचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement