Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...

Vasai Virar Election Result 2026: भाजपने 43 जागा जिंकून मुख्य विरोधी पक्षाची जागा भक्कम केली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिल्पा दिवाकर सिंग या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Vasai Virar Election Result 2026: वसई-विरार महानगरपालिकेच्या निकालाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, या परिसरात अद्यापही हितेंद्र ठाकूर हेच 'ठाकूर' आहेत. बहुजन विकास आघाडीने (BVA) 70 हून अधिक जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले असले. तरी देखील काही दिग्गज नेत्यांच्या पराभवामुळे हितेंद्र ठाकूर यांना धक्का बसला आहे.

वसई विरार या 115 सदस्य असलेल्या महापालिकेत बहुजन विकास आघाडीने 71 (70 बविआ + 1 काँग्रेस) जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला आहे. महायुतीला 44 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, या विजयापेक्षा वर्षानुवर्षे बविआचा किल्ला लढवणाऱ्या पराभूत शिलेदारांची चर्चा जास्त होत आहे. बहुजन विकास आघाडीचा विजयाचा जल्लोष सुरू असला, तरी काही निकाल जिव्हारी लागणारे आहेत.

रुपेश जाधव यांचा पराभव

माजी महापौर रुपेश जाधव यांचा झालेला पराभव हा पक्षासाठी सर्वात मोठा धक्का आहे. त्यांनी तातडीने फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज दिला आहे, ज्यावरून या लढतीतील चुरस लक्षात येते.

(नक्की वाचा-  TMC Election 2026: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कुणी मारली बाजी? वाचा विजयी उमेदवारांची यादी)

ठाकूर कुटुंबाला धक्का

हितेंद्र ठाकूर यांचे चुलत भाऊ आणि माजी सभापती पंकज ठाकूर यांचा भाजपच्या मेहुल शहा यांनी पराभव केला. घरच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

Advertisement

हार्दिक राऊत पराभूत

माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांना भाजपच्या गौरव राऊत यांनी धूळ चारली. प्रभाग 5 मध्ये बविआचे एकापाठोपाठ एक दिग्गज पराभूत झाल्याने पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

भाजपने 43 जागा जिंकून मुख्य विरोधी पक्षाची जागा भक्कम केली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिल्पा दिवाकर सिंग या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा-  Vasai Virar Election Results 2026: हितेंद्र ठाकुरांनी गड राखला; बविआची सत्तेकडे वाटचाल, भाजपला मोठा धक्का)

वसई-विरार महापालिका अंतिम निकाल

  • बहुजन विकास आघाडी - 70
  • भाजप - 43
  • शिवसेना (शिंदे) - 1
  • काँग्रेस 1