Navi Mumbai News: अ‍ॅम्बुलन्स चालक जेवायला गेला, तरुणाचा उपचाराविनाच मृत्यू; वाशीतील घटना

हर्ष पटेल 2 डिसेंबर रोजी दुपारी 1.37 वाजता चेंबूर येथून पनवेल लोकलने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो बेशुद्ध पडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Navi Mumbai:

पनवेल-खांदेश्वर दरम्यान तरुणीला लोकलमधून ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच, नवी मुंबईतील हार्बर रेल्वेच्या सुरक्षेचा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वाशी स्थानकात वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने हर्ष पटेल या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाहिकेचा चालक जागेवर नसल्याने या तरुणाला प्राण गमवावे लागल्याचा खळबळजनक आरोप त्याच्या बहिणीने केला आहे.

नेमकी घटना काय?

हर्ष पटेल 2 डिसेंबर रोजी दुपारी 1.37 वाजता चेंबूर येथून पनवेल लोकलने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो बेशुद्ध पडला. सहप्रवाशांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना (GRP) कळवले. गाडी दुपारी 1.57 वाजता वाशी स्थानकात पोहोचली. पोलीस आणि प्रवाशांनी त्याला स्थानकाबाहेर असलेल्या 108 रुग्णवाहिकेपर्यंत नेले, मात्र तिथे गेल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले.

रुग्णवाहिका होती, पण चालक गायब!

स्थानकाबाहेर रुग्णवाहिका उभी होती, परंतु तिचा चालक जेवणासाठी बाहेर गेला होता. सुमारे 15 मिनिटे हर्षला रुग्णवाहिकेत ठेवून चालक येण्याची वाट पाहावी लागली. अखेर वेळ जात असल्याचे पाहून रेल्वे पोलिसांनी हर्षला आपल्या सरकारी जीपमधून नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात नेले. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

(नक्की वाचा-  देशातील सर्वात मोठी डिजिटल फसवणूक; 8 कोटींची गंडा, माजी IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न)

बहिणीचे गंभीर आरोप आणि रेल्वेचे उत्तर

हर्षची बहीण अमिका हिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत रेल्वे प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. वाशी स्थानकात स्ट्रेचर, व्हीलचेअर किंवा प्राथमिक उपचारांची कोणतीही सक्षम व्यवस्था नव्हती. हर्षला कपड्याच्या साहाय्याने उचलून सबवेमधून नेण्याची वेळ प्रवाशांवर आली. रुग्णवाहिका चालकाचा कोणताही 'बॅकअप' प्रशासनाकडे उपलब्ध नव्हता. जीआरपी चौकीत तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि त्यांना सीएसएमटी येथील DRM कार्यालयात पाठवण्यात आले.

Advertisement

(नक्की वाचा-  महायुतीत दोस्तीत कुस्ती! पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या NCP ला शह देण्यासाठी भाजप-शिंदेंची सेना एकत्र)

प्रशासकीय निष्काळजीपणा

वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी देखील कबूल केले की, रुग्णवाहिका चालकाने जागा सोडणे हा गंभीर निष्काळजीपणा आहे. नियमानुसार, आपत्कालीन रुग्णवाहिकेचा चालक *24* तास उपलब्ध असणे अनिवार्य आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवरील 'क्विक रिस्पॉन्स टीम' आणि वैद्यकीय सुविधेच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.

Topics mentioned in this article