जाहिरात

Mumbai Infrastructure : मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, नवी मुंबईतून येणारा 'हा' मार्ग पूर्ण

सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Mumbai Infrastructure : मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, नवी मुंबईतून येणारा 'हा' मार्ग पूर्ण
मुंबई:

प्रथमेश गडकरी, प्रतिनिधी 

सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दच्या दिशेला येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वाशी खाडी पुलावर दोन नवीन पूल बांधण्यात आले आहेत. प्रत्येक पुलावर तीन मार्गिका आहेत, ज्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 559 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या पुलांची लांबी 1837 मीटर असून, मुंबईकडील पोहोच मार्ग 380 मीटर आहे. यापूर्वी मानखुर्दहून वाशीकडे जाणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

त्यानंतर आता वाशीकडून मानखुर्दच्या दिशेला जाणारा पूलही पूर्ण झाला आहे. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी कमी होईल आणि  वाशी ते मानखुर्द प्रवास जलद होऊन वेळेची बचत होईल. अशी आशा एमएसआरडीसीचे अधिकारी आणि वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दोन पूलांची बांधणी 

1994 पासून सायन-पनवेल मार्गावरून वाहतूक करण्यासाठी सहा पदरी पूल कार्यरत आहे. परंतु, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हा पूल अपुरा पडत होता. संध्याकाळच्या वेळेस या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. वाहन चालकांची ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वाशी खाडी पुलावर दोन नवीन पूल बांधण्यात आले आहेत.

( नक्की वाचा : Maharashtra Budget 2025 : वाहतूक कोंडी सुटणार, तिसरं विमानतळ मिळणार! वाचा मुंबईकरांना काय मिळालं? )

प्रवाशांना फायदा

वाशी ते मानखुर्द दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे नवीन पूल अत्यंत फायदेशीर ठरतील. या पुलांमुळे प्रवासातील वेळ कमी होईल, ज्यामुळे प्रवाशांना अधिक वेळ मिळेल. तसेच, वाहतूक कोंडीमुळे होणारा मनस्तापही कमी होईल. वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे नवीन पूल बांधण्यात आले आहेत. या पुलांमुळे वाहनचालकांचा प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: