जाहिरात
Story ProgressBack

मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग

मुंबईतील प्रेस क्लब येथे ‘मेकिंग मुंबई अ लिव्हेबल, मॉडर्न सिटी’ नावाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे देखील सहभागी झाले होते.

Read Time: 2 mins
मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग
मुंबई:

मुंबई शहरातील कोस्टल रोड, अटल सेतू आणि विस्तारत जाणारे मेट्रो सेवेचे जाळे यामुळे गेल्या काही महिन्यांत मुंबईच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदललेला पाहायला मिळाला. मात्र वाढती वाहतूक आणि धुळीच्या प्रदूषणामुळे या विकासाच्या व्यवहार्यतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मुंबईच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी मुंबई प्रेस क्लबतर्फे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे देखील सहभागी झाले होते. गगराणी यांनी म्हटले की, विकासामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी मोठी मदत होणार आहे. 

मुंबईतील प्रेस क्लब येथे ‘मेकिंग मुंबई अ लिव्हेबल, मॉडर्न सिटी' नावाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बोलताना मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले की, "मुंबई शहराच्या पायाभूत सुविधेसंदर्भात बोलायचे झाल्यास मुंबई ही एका मोठ्या बदलाला सामोरी जात आहे. हा बदल सहजपणे जाणवणारा असून जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांप्रमाणेच मुंबई शहरातही बदल होत आहे. मात्र या बदलाचे चांगले सामाजिक आणि आर्थिक बदलही पाहायला मिळणार आहे. "

असा प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे होणारा बदल हा खूप मोठ्या स्वरुपाचा असतो.  गगराणी यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे उदाहरण देताना म्हचले की जर हा प्रकल्प जर अस्तित्वात आलाच नसता तर आपल्याला विकासाच्या संधीपासून वंचित राहावे लागले असते.  कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक ज्याला अटल सेतू असे नाव देण्यात आलेले आहे या दोन प्रकल्पांमुळे बांधकाम क्षेत्रात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. जनतेला स्वीकारार्ह असतील असे प्रकल्प उभारणे गरजेचे असून अशा प्रकल्पांच्या दीर्घकालीन  देखभालीसंदर्भातही विचार होणे गरजेचे असते. 

अवश्य वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्या दुपारी वाहतूक राहणार बंद, गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक

पायाभूत सुविधांमध्ये वाढ झपाट्याने होत असताना, या प्रकल्पांची टिकाऊपणाची क्षमता कमी झाली आहे. "गुणवत्ता नियंत्रण नसल्यामुळे टिकाऊपणा कमी होत आहे.  यात सुधारणा होणे गरजेचे आहे. ," असे माजी सनदी अधिकारी आर सी सिन्हा यांनी म्हटले.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, तपासासाठी SIT ची स्थापना

मुंबईवरील भार कमी व्हावा यासाठी नवी मुंबईची उभारणी करण्यात आली होती. शहरीकरण ही निरंतर प्रक्रिया असल्याने देशभरात नवी मुंबईसारख्या आणखी शहरांची निर्मिती होण्याची गरज असल्याचे सिन्हा यांनी म्हटले. आर्किटेक्ट पीके दास यांनी या निमित्ताने बोलताना म्हटले की, पर्यावरणाचा आपण पायाभूत सुविधांमध्ये समावेश केला तर वातावरण बदलामुळे नागरिकांचे जाणारे प्राण वाचवण्यात आपण यशस्वी होऊ. वाढत्या उष्णतेमुळे मुंबईतील नागरिकांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. याचा परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवरही होत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग
pune-porsche-crash-pune-teen-drivers-father-had-elaborate-escape-plan-know how-he-was-caught
Next Article
अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आखला होता पळून जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी कसा उधळला?
;