जाहिरात

Mhada Lottery 2024 : म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार, यंदाच्या लॉटरीतील घरांचाही समावेश

यंदाच्या लॉटीरमधलीही घरे ही खूप महाग असल्याची टीका करण्यात येत होती. म्हाडाने या टीकेची दखल घेत म्हाडाच्या काही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mhada Lottery 2024 : म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार, यंदाच्या लॉटरीतील घरांचाही समावेश
मुंबई:

म्हाडाच्या 2030 घरांसाठीची जाहिरात (Mhada Lottery 2024) प्रसिद्ध झाली आहे.  यासाठी अर्ज भरण्यासाठीची मुदत 4 सप्टेंबरपर्यंत आहे (Mhada Home Application). म्हाडाची लॉटरी आधी 13 सप्टेंबर रोजी काढली जाणार होती. ही तारीख बदलून आता 19 सप्टेंबर करण्यात आली आहे. यंदाच्या लॉटीरमधलीही घरे ही खूप महाग असल्याची टीका करण्यात येत होती. म्हाडाने या टीकेची दखल घेत म्हाडाच्या काही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी विकासकांनी बांधलेली आणि म्हाडाला हस्तांतरीत केलेल्या घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. खासगी विकासकांनी बांधल्यामुळे या घरांच्या किंमती जास्त होत्या.  एकूण 2030 घरांपैकी 370 घरांच्या किंमती कमी करण्यात आलेल्या आहेत.  33/5 आणि 33/7 अंतर्गत म्हाडाला प्राप्त झालेल्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  म्हाडाच्या काही निवडक घरांमधील EWS घरांची किंमत 25 % ने कमी होणार आहे, LIG घरांची किंमत 20 % ने कमी होणार आहे तर MIG घरांची किंमत 15% ने कमी होणार आहे. याशिवाय HIG घरांची किंमत 10 % ने कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

हे ही वाचा : कर्ज मिळणं होणार सोपं, काय आहे रिझर्व्ह बँकेची क्रांतीकारी ULI पद्धत?

म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 2030 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. शिवाय  सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील. अशाप्रकारे संगणकीय  सोडतीच्या माध्यमातूनच म्हाडा सदनिकांचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचे वितरण केले जाऊ शकत नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.  

हे ही वाचा : सावधान! म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच बनावट अनधिकृत संकेतस्थळाची निर्मिती

म्हाडाच्या संगणकीय सोडतीकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय सोडत प्रणाली वापरण्यात येत आहे. ही प्रणाली अत्यंत सोपी, सुलभ, सुरक्षित आणि महत्वाचे म्हणजे पूर्णता ऑनलाइन आहे व यामुळे ही प्रणाली मानवी हस्तक्षेपास वाव देत नाही.  म्हाडाच्या सोडत प्रणालीमध्ये अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया झाल्यावर त्यांचे कायमस्वरूपी प्रोफाइल तयार होते. या प्रोफाइलमध्ये अर्जदार आपले कागदपत्र सादर (upload) करतील. या कागदपत्रांची प्रणालीद्वारे पडताळणी केली जाते व पात्र कागदपत्रांनुसार अर्जदाराची पात्रता निश्चिती केली जाते. यानंतरच अर्जदार सोडतीसाठी अर्ज करू शकतील व अर्ज भरल्यानंतरच अनामत रकमेचा भरणा करण्याबाबतचा पर्याय या प्रणालीमध्ये उपलब्ध होतो. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'...तर ही दुर्घटना टाळता आली असती'; कला संचालनालयाचा मोठा गौप्यस्फोट
Mhada Lottery 2024 : म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार, यंदाच्या लॉटरीतील घरांचाही समावेश
chhatrapati-shivaji-maharaj-statue-collapse-devendra-fadnavis-reaction-on-sharad-pawar-accusations
Next Article
'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार