मनोज सातवी, विरार
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. प्रचार थांबला असला तरी पक्ष आणि उमेदवार छुप्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. आहे. तर काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचाही आरोप होत आहे. असाच काहीसा प्रकार विरारमध्ये पाहायला मिळाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
(नक्की वाचा - राहुल गांधींना 'ते' वक्तव्य भोवणार? पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश )
विरारच्या विवंता हॉटेलमध्ये बसलेले असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. एका बॅगेतून पैशांची पाकीटं काढत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनोद तावडेंसमोर दाखवली. तसेच ही बॅग विनोद तावडेंची असल्याचा आरोपही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
(नक्की वाचा - राहुल गांधींना 'ते' वक्तव्य भोवणार? पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश )
क्षितीज ठाकूरही संतापले
घटनेच्या वेळी पोलीस देखील तेथे उपस्थित होते. मात्र पोलिसांना देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली. घटनेची माहिती मिळतात बविआचे आमदार क्षितीज ठाकूर देखील घटनास्थळी पोहोचले आणि विनोत तावडेंना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. क्षितीज ठाकूर यांनी एक डायरी दाखवत त्यात काही नोंदी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. क्षितीज ठाकूर देखील आक्रमक दिसत आहे. विनोद तावडे यांनी त्यांना देखील समजवण्याच्या प्रयत्न केला.