जाहिरात

बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या साक्षीदाराचा VIDEO आला समोर; गोळीबारानंतर नेमकं काय घडलं? पाहा

Baba Siddique : व्हिडीओ दिसत आहे की, बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला गोळी लागली आहे. ती व्यक्ती जखमी अवस्थेत जमिनीवर पडली आहे. या व्यक्तीच्या आजूनबाजूला पोलीस आणि नागरिकांची गर्दी दिसत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतरचा हा व्हिडीओ आहे.  

बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या साक्षीदाराचा VIDEO आला समोर; गोळीबारानंतर नेमकं काय घडलं? पाहा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला झाला, त्यावेळी त्यांच्यासोबत असेलल्या व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्यक्तीच्या मदतीने मुंबई पोलिसांना अनेक अनुत्तरित असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बाबा सिद्दिकी यांच्यावर आमदार झिशान सिद्दिक यांच्या ऑफिसबाहेर हल्ला झाला होता. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या होत्या. यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. लीलावती रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेत बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या पायालाही गोळी लागली होती. या घटनेनंतरचा एक व्हिडीओ आता समोर आली आहे. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला गोळी लागली आहे. ती व्यक्ती जखमी अवस्थेत जमिनीवर पडली आहे. या व्यक्तीच्या आजूनबाजूला पोलीस आणि नागरिकांची गर्दी दिसत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतरचा हा व्हिडीओ आहे.  

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात ही व्यक्ती महत्वाचा साक्षीदार ठरु शकते. बाबा सिद्दिका यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी ही व्यक्ती त्यांच्यासोबत होती. त्यामुळे हल्लेखोरांना ही व्यक्ती ओळखू शकते. नेमकं त्यावेळी काय घडलं? हे देखील सविस्तर सांगू शकते. या व्यक्तीने दिलेली माहिती मुंबई पोलिसांसाठी महत्त्वाची ठरु शकते आणि तपासाला वेग मिळू शकतो.  

(नक्की वाचा- Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली? पोलीस तपास कोणत्या दिशेने?)

तीन आरोपींना अटक, तीन फरार

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी गुरमेल सिहं, धर्मराज कश्यप या दोघांना घटनास्थळावरुन अटक करण्यात आली होती. आरोपी धर्मराज अल्पवयीन असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. मात्र वैद्यकीय चाचण्यांमध्ये धर्मराज अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर शुभम लोणकर यानं फेसबुक पोस्ट लिहित हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारल्याचं सांगितलं होतं. पोलीस त्याच्या फेसबुक पोस्टची चौकशी करत आहेत.

( नक्की वाचा : बिश्नोई गँगचा सूत्रधार कोण? सातासमुद्रापार बसून कशी चालवली जाते गँग? )

फरार आरोपी शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकरने कर्वेनगर वारजे भागात आरोपींना रूम भाड्याने देण्यासाठी मदत केली होती असा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणातल्या तीन आरोपींची चौकशी सुरू तर तिघांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: