जाहिरात

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली? पोलीस तपास कोणत्या दिशेने?

Baba Siddique Murder Case : सलमान खान, दाऊद, बिश्नोई गँग या सगळ्यात अडकून इतर कोणत्या गँगने ही हत्या घडवून आणली नाही ना? मुंबई क्राईम ब्रांच या अँगलने देखील तपास करत आहे. 

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली? पोलीस तपास कोणत्या दिशेने?

राष्ट्रवादीचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला. एवढ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या हत्येने कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. मुंबई पोलिसांना हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला असून तीन आरोपींना अटक देखील केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. मात्र बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पोलिस विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहे 

SRA प्रोजेक्टवरुन राजकारण आणि व्यावसायिक वाद

वांद्रे परिसरात एक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरु आहे. याबाबत बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांनी काही शंका उपस्थित करत विरोध सुरु केला होता. ज्या डेव्हलपकरडे हा प्रकल्प होता त्याविरोधात सिद्दिकी आक्रमक झाले होते. याप्रकरणी झिशान सिद्दिकी यांना खेरवाडी पोलिसांना अटक देखील केली होती. या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत. 

(नक्की वाचा-  Suraj Chavan-Ajit Pawar : सूरज चव्हाणला अजित पवारांकडून मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं गिफ्ट)

सलमान खानशी मैत्री, लॉरेन्श बिश्नोई गँगचा बदला

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेकदा धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर फायरिंग देखील झाली होती. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव पुढे आलं होतं. या प्रकरण अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी सलमान खानचे मित्र असलेल्या बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. याचा देखील पोलीस तपास करत आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

दाऊद कनेक्शन

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण दाऊद कनेक्शनच्या दिशेने देखील तपास सुरु आहे. शुभम लोणकरच्या फेसबुक पोस्टच्या आधारे तपास सुरु आहे. शुभम लोणकरने फेसबुकला शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "सिद्दिकीची चांगुलपणाचे आता पूल बांधले जात आहेत. मात्र तो एकेकाळी दाऊदसोबत मकोका कायद्यात होता. त्याच्या मृत्यूचे कारण अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणे आहे." 

(नक्की वाचा - Baba Siddiqui News : 48 वर्षे काँग्रेसमध्ये, 8 महिन्यांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश; कोण होते बाबा सिद्दीकी?)

दुसरी कोणती गँग सामील?

सलमान खान, दाऊद, बिश्नोई गँग या सगळ्यात अडकून इतर कोणत्या गँगने ही हत्या घडवून आणली नाही ना? मुंबई क्राईम ब्रांच या अँगलने देखील तपास करत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: