जाहिरात

Ashok Kharat case: "अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो!" विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा

Vijay Wadettiwar on Ashok Kharat Case: विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण दाबण्यासाठी खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

Ashok Kharat case: "अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो!" विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा

Ashok Kharat case Update: नाशिकचा भोंदूबाबा आणि अनेक महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. या प्रकरणातील धागेदोरे थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले असून, पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काऊंटर देखील केला जाऊ शकतो, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

पेन ड्राईव्ह समोर आणा, सगळे नागडे होतील

विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील पुराव्यांवरून सरकारला घेरले आहे. "अशोक खरातचे लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केल्याचे सांगितले जातेय. मग त्यातील पेन ड्राईव्ह समोर का आणला जात नाही? तो समोर आला तर मंत्रिमंडळातील दोन-तीन मंत्र्यांची विकेट जाईल," असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केले.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: गणितात मठ्ठ, भाषांचीही बोंब, भोंदूबाबाचा दहावीची रिझल्ट आला समोर, नावंही बदललं!)

प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यात वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एनकाऊंटर केला जाण्याची शक्यता विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली.

(नक्की वाचा-  Alcohol Prices to Rise: मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री! बिअर आणि दारुच्या किमती वाढणार? काय आहे कारण?)

चाकणकर आणि तटकरेंवर निशाणा

रुपाली चाकणकर यांच्यावरून वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरही टीका केली. "चाकणकर अजून अनेक पदांवर कार्यरत आहेत. सुनील तटकरे जोपर्यंत ठरवत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर पूर्ण कारवाई होणार नाही. तटकरेंनीच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे," असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीत सध्या सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोनच 'बॉस' असून तेच या प्रकरणाचा निकाल लावतील, असा टोला त्यांनी लगावला.

(नक्की वाचा-  Cylinder Booking Rules: गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले! नवीन सिलिंडरसाठी किती दिवस वाट पाहावी लागणार?)

SIT तपासावर अविश्वास

विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "सरकार अर्ध सांगतंय आणि अर्ध लपवत आहे. एसआयटीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल, यावर आमचा अजिबात विश्वास नाही. मुख्यमंत्री आपल्या लोकांना आणि मित्रपक्षांना वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील" असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com