जाहिरात

Sathaye College Student Death: संध्याने आत्महत्या केली ? साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसोबत नेमके काय घडले ??

Sathaye College Student Death: साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या मृत्यूसंदर्भात माहिती देत असताना म्हटले आहे की,  संध्या पाठक ही महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आढळून आली.

Sathaye College Student Death:  संध्याने आत्महत्या केली ? साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसोबत नेमके काय घडले ??
मुंबई:

Sathaye College Student Death: मुंबईतील विले पार्ले येथील नामवंत महाविद्यालयात एका विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला. संध्या पाठक असं या विद्यार्थिनीचे नाव असून तिने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 19 जून रोजी म्हणजे गुरुवारी सकाळी सवासात वाजेच्या सुमारास संध्याचा मृतदेह दिसला होता. संध्या ही BSC Statistics अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती अशी माहिती साठ्ये महाविद्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

(नक्की वाचा : धक्का लागला म्हणून 13 वर्षांच्या मुलाची बेदम मारत गळा चिरून हत्या; दोघांना अटक)

'त्या' आवाजाने लक्ष गेले 

साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या मृत्यूसंदर्भात माहिती देत असताना म्हटले आहे की,  संध्या पाठक ही महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आढळून आली. सदर घटनेचा आवाज आल्याने महाविद्यालयात उपस्थिती असलेल्या गावडे कर्मचारी आणि दोन विद्यार्थी यांनी स्थळी मदतसाठी धाव घेतली आणि सदर विद्यार्थिनीला महाविद्यालया नजीक असणाऱ्या गावडे हॉस्पिटलमध्ये तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचाराच्या दरम्यान हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Sathaye College Student Sandhya Pathak Death) महाविद्यालयाने सदर विद्यार्थिनीच्या पालकांशी त्वरित संपर्क साधून विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून घेतले. सदर घटनेचा तपास विलेपार्ले पोलीस करत आहेत. 

(नक्की वाचा : लाच मागितली, मग नाकारली; तरीही बडा अधिकारी अडकलाच)

संध्याचा मृत्यू नेमका झाला कसा ?

संध्याच्या मृत्यूची बातमी तिच्या घरच्यांना देण्यात आली. हे कळताच तिच्या घरची मंडळी तातडीने रुग्णालयात पोहोचली होती. संध्याचा म-तदेह पाहून तिच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.  संध्याचा मृत्यू कसा झाला या प्रश्नाचे उत्तर त्यांनाही सापडत नव्हतं. संध्याला कोणीतरी धक्का दिला ज्यामुळे तिचा पडून मृत्यू झाला असावा असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. संध्याच्या घरच्यांनी म्हटले की, 21 वर्षांची संध्या कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरीडॉरमध्ये फिरताना दिसली होती. मग ती अचानक कशी काय पडली ? 

संध्या ही नालासोपाऱ्याची राहायची, तिच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कॉलेजमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरू केला असून आतापर्यंत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे संध्याचा मृत्यू नेमका कसा झाला हा प्रश्न गूढ निर्माण करू लागला आहे. संध्याने आत्महत्या केली,  तिला कोणी धक्का दिला का ती अपघाताने पडली या सगळ्या गोष्टींचा उलगडा पोलीस तपासातून उघड होईल.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com