जाहिरात
This Article is From Mar 13, 2026

Viral Video: महिला दारु प्यायली, महामार्गावर बेभान नाचली, झिंगाट डान्समुळे पुढे जे काही घडलं ते...

महामार्गाच्या पहिल्या लेन पासून तिसऱ्या लेंनर्यंत पर्यंत ही महिला भर महामार्गावर अधून मधून नाचत होती.

Viral Video: महिला दारु प्यायली, महामार्गावर बेभान नाचली,  झिंगाट डान्समुळे पुढे जे काही घडलं ते...
वसई:

मनोज सातवी 

सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यात एक महिला मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती महामार्गाच्या मधोमध उभी आहे. बाजून वेगात वाहनं जाताना ही दिसत आहेत. ही महिला दारू पिऊन झिंगाट डान्स करत असल्याचं समोर आलं आहे. यावेळी तिला कुणी अडवलं नाही. त्यातून मोठा अपघात होण्याची भीती होती. पण तिच्या मनात काही भीती नव्हती. ती आपल्या धुंदीत होती. काही वाहनं तर या अचानक डान्स करणाऱ्या महिलेमुळे बाचकली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  

नक्की वाचा - Positive news: 'या' गावाला नाही गॅसचे टेन्शन, ना चुलीचा वापर, 35 वर्षापासून ऊर्जेसाठी भन्नाट जुगाड

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खाणिवडे जवळ हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्गाच्या मध्यभागी एका मद्यधुंद महिलेने गोंधळ घालतला. शिवाय ती  नाचत ही होती. ती त्यावेळी नशेत असल्याचं सांगितलं जात आहे. तिच्या या गोंधळामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. यावेळी मोठा अपघात ही झाला होता. याची माहिती मात्र वाहतूक पोलीसांना लागलीच नाही. किंवा त्या महिलेला कुणी अडवण्याची हिंमत ही दाखवली नाही. 

नक्की वाचा - Dhule News: गॅस सिलिंडरसाठी राडा! लोकांचा आक्रोश, RPF जवानालाच फटकवलं, टेन्शनसह संभ्रम ही वाढला

महामार्गाच्या पहिल्या लेन पासून तिसऱ्या लेंनर्यंत पर्यंत ही  महिला भर महामार्गावर अधून मधून नाचत होती. मात्र जवळच शिरसाड येथे विरार वाहतूक पोलिस चौकी आहे. तरी देखील पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर उतरली. रस्त्याच्या मधोमध नाचू लागली. त्यामुळे त्या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागले. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकला असता, कारण वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता  होती.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com