मुंबईत मराठी विरुद्ध हिंदीचा मुद्दा आता लोकल ट्रेनपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सेंट्रल लाईनवरील एका लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात मराठी आणि हिंदीवरून महिलांमध्ये जोरदार वाद झाला. सीटवरून सुरू झालेला किरकोळ वाद पाहता पाहता भाषेवरून संघर्षात बदलला. या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याता जोरदार राडा झाल्याचे दिसत आहे. मराठी बोलता यायला पाहिजे यासाठी आता मराठी भाषीक जागोजागी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
'मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोला'
लोकल ट्रेनच्या या व्हिडिओमध्ये एक महिला मराठीत बोलताना दुसऱ्या महिलांना, मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोला, नाहीतर बाहेर निघा" असं म्हणताना ऐकू येत आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या इतर महिलाही या वादात सामील झाल्या. त्यानंतर हे प्रकरण भाषा वादापर्यंत पोहोचले. हा वाद सेंट्रल रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात झाल्याचे सांगितले जात आहे. भाषेवरून वाढणारा हा संघर्ष पाहता आता रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि जीआरपी (GRP) पर्यंत पोहोचला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.
'मराठी विरुद्ध हिंदी'वाद संवेदनशील मुद्दा
महाराष्ट्रामध्ये 'मराठी विरुद्ध हिंदी' वाद हा एक संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या गुंतागुंतीचा मुद्दा आहे. तो भाषिक अस्मिता, सांस्कृतिक ओळख आणि राजकीय विचारसरणीशी संबंधित आहे. पण आता हा भाषा वाद रस्त्यांवरही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक उत्तर भारतीयांना मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी हिंदीला समर्थन दिले होते. खरं तर, महाराष्ट्रात मराठी भाषेला राज्याची मातृभाषा आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानले जाते. पण गेल्या काही काळात महाराष्ट्रात, विशेषतः मायानगरी मुंबईत, हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढली आहे. हिंदी भाषिक लोकांची वाढती संख्या काही मराठी भाषिक समुदायांकडून मराठी संस्कृती आणि भाषेवरील 'आक्रमण' म्हणून पाहिली जात आहे. लोकांची हीच विचारसरणी आता वादाच्या स्वरूपात समोर येत आहे.
मराठीला प्राधान्य द्या, पण हिंदी...
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे (MNS) पक्ष विशेषतः हिंदी भाषिक उत्तर भारतीयांविरोधात मोहीम राबवताना दिसत आहे. राज ठाकरे यांचे म्हणणे आहे की, मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिले जावे. मराठीला शाळांमध्ये अनिवार्य करण्याची मागणीही सातत्याने केली जात आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेलाच प्राधान्य दिले जात आहे. शिवाय ती अनिवार्य केलेली आहे. इतके वर्ष महाराष्ट्रात आणि मुंबईत राहून मराठी बोलता यायला पाहिजे ऐवढी माफक अपेक्षा मराठी भाषीक करत आहेत. मराठी भाषेचा सन्मान हा झालाच पाहीजे असं ही त्याचं म्हणणं आहे.
मीरा रोड परिसरात एका दुकानदाराला मारहाण
महाराष्ट्र सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा वाढला. मराठी माणसांच्या आक्रमक भूमीके पुढे सरकारला झुकावे लागले. त्यांनी हा निर्णय मागे घेतला. त्यानंतर मराठी भाषेसाठी मराठी माणूस मुंबईत आक्रमक झालेला दिसला. मुंबईतील मीरा रोड परिसरात एका दुकानदाराला मारहाण केल्याचे प्रकरणही समोर आले. त्यानंतर वातावरण आणखी तापले होते.