
पुणे पोर्शे कार प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालला आज शनिवारी दुहेरी दणका बसला आहे. शनिवारी सकाळी त्याची पत्नी शिवानी अगरवाल हीला अपघात प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्याचे महाबळेश्वर इथे असलेले अनधिकृत पंचतारांकीत हॉटेल सील करण्यात आले आहे. या बहाद्दराने सर्व नियम धाब्यावर बसवून सरकारी भाडेपट्ट्याच्या जागेत एक पंचतारांकीत हॉटेल थाटलं होत. धक्कादायक बाब म्हणजे यात अनधिकृत बारही चालवला जात असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सील करण्यापूर्वी या हॉटेलमध्ये असलेल्या पर्यटकांना इथून अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील विशाल अगरवाल याचा आणखी एक प्रताप समोर आला होता. त्याचे महाबळेश्वर कनेक्शन उघड झाले होते. नियम धाब्यावर बसवुन शासकीय भाडेपट्ट्याच्या जागेत त्याने पंचतारांकीत हॉटेल उभारले होते. याच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासन त्याच्या हॉटेलवर कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जात होता. त्यानंतर आता प्रशासनाने या हॉटेलवर कारवाई करत ते सिल केले आहे.
हेही वाचा - पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक, मुलाला वाचवण्यासाठी केला घृणास्पद प्रकार
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी शनिवारी पहाटे विशाल अगरवाल याची पत्नी शिवानीला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली. आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यासंबंधात ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. ससून रुग्णालयात आरोपीचे रक्ताचे नमुने कोणा महिलेच्या रक्ताच्या नमुन्याशी बदलल्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या समितीला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा रक्ताचा नमुना कोणा महिलेच्या रक्तासोबत बदलण्यात आलं होतं. रक्ताचा नमुना बदलण्यासाठी आरोपीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना तीन लाखांची लाच दिली होती. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्याच रक्ताच्या नमुन्यासोबत अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा संशय क्राइम ब्रँचकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली. पहाटे अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी सकाळी त्याचे महाबळेश्वर इथले हॉटेलही सिल करण्यात आले.
हेही वाचा - अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट उघड, धागेदोरे पाकिस्तानात
पुण्यातील कल्याणीनगरात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन तरूण बाल सुधारगृहात आहे. तर त्याचे वडील विशाल अगरवाल हे पोलिस कोठडीत आहेत. शिवाय आजोबा सुरेंद्र अगरवालही पोलिस कोठडीत आहेत. आता शिवानी अगरवाल हिलाही अटक करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world