संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पर्वकाळात विठ्ठलाच्या खजिन्यात तब्बल आठ कोटी 34 लाखांचं दान आलं आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन कोटीचं वाढीव दान आहे. यामध्ये विठ्ठलाच्या चरणावर तब्बल 77 लाख रुपये दान करण्यात आलं आहे. तर लाडू प्रसाद विक्रीतून 98 लाखाचं दान आलं आहे. सोनं आणि चांदी यांचे दान जवळपास दोन कोटी 50 लाखांच्या घरात आहे.
देणगी पावत्यांच्या स्वरुपात जवळपास तीन कोटी लाख 82 लाख रुपये दान करण्यात आले आहे. इतर योजनांमधूनही दान आलं आहे. तर आषाढी वारीच्या काळात तब्बल दहा लाख 88 हजार भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. मंदिर समितीकडून याबाबत नुकतीच माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नक्की वाचा - पुराचं पाणी ओसरलं, तरीही पुणेकरांच्या अडचणी संपेना; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
विठ्ठलाचा क्षीण घालवण्यासाठी आज प्रक्षाळ पूजा...
आषाढी वारीच्या काळात रात्रंदिवस भक्तांना दर्शन देणाऱ्या विठुरायाचा क्षीण घालवण्यासाठी विठ्ठलाची आज प्रक्षाळ पूजा संपन्न होत आहे. या प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठलास गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. संपूर्ण मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात आले आहे. या पूजेनंतर विठ्ठलाचे सर्व राजोपचार सुरू होतील आणि 24 तास दर्शन बंद होईल.