जाहिरात
This Article is From Jul 26, 2024

पुराचं पाणी ओसरलं, तरीही पुणेकरांच्या अडचणी संपेना; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

पुण्यात (Pune Rain Update) 25 जुलै रोजी झालेल्या पावसाने 26 जुलैची आठवण करून दिली. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना आणि त्याचे व्हिडिओ अंगावर काटा आणणारे होते.

पुराचं पाणी ओसरलं, तरीही पुणेकरांच्या अडचणी संपेना; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

पुण्यात (Pune Rain Update) 25 जुलै रोजी झालेल्या पावसाने 26 जुलैची आठवण करून दिली. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना आणि त्याचे व्हिडिओ अंगावर काटा आणणारे होते. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुणेकरांना आणखी एका संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. पाणी ओसरल्यानंतर ठिकठिकाणी चिखल झाला आहे. याची स्वच्छता वेळीच केली नाही तर रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे याभागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतली असून जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. 

नक्की वाचा - चंद्रकांत खैरे निवडणूक लढवणार? लोकसभेच्या पराभवानंतर आता विधानसभेची तयारी

स्वच्छतेसाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी 500 स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी 100 सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.